टूथपेस्ट सारखे बदलले या अभिनेत्रींनी बॉयफ्रेंड, नंबर ८ वालीने तर तब्बल १४ बदलले, जाणून घ्या !

bollyreport
5 Min Read

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे नाव बरेचदा अनेक कलाकार, उ’च्च’भ्रू व्यक्ती, खेळाडू, उद्योगपती यांच्यासोबत जोडले जाते. सुष्मिता सेन सध्या उद्योगपती ललित मोदीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. ४६ वर्षीय सुष्मिताचे हे पहिले प्रेम नाही.

आतापर्यंत, तिचे नाव चित्रपट आणि व्यावसायिक जगाशी संबंधित सुमारे १२ सेलिब्रिटींशी जोडले गेले आहे आणि बहुधा ती एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिला इतके लोक आवडतात. पण इंडस्ट्रीत वारंवार बॉयफ्रेंड बदलणाऱ्या अभिनेत्रींची कमी नाही. आज आपण अशा काही अभिनेत्री बघणार आहोत, ज्यांचे बरेचसे बॉयफ्रेंड होते.

1. प्रियांका चोप्रा – 20-22 वर्षांच्या मॉडेलिंग आणि चित्रपट कारकिर्दीमध्ये प्रियांका चोप्राचे नाव जवळपास १० लोकांशी जोडले गेले. यामध्ये मॉडेल असीम मर्चंट, अभिनेता हरमन बावेजा, शाहिद कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान, हॉलिवूड अभिनेता टॉम हिडलसन, जेरार्ड बटलर, रणबीर कपूर, हृतिक रोशन आणि अमेरिकन गायक आणि संगीतकार निक जोनास यांचा समावेश आहे. प्रियांकाने १० वर्षांनी लहान असलेल्या निक जोनासशी लग्न केले आहे.

2. रेखा – सदाबहार दिवा रेखा चित्रपटसृष्टीत आल्यापासून आतापर्यंत त्यांचे ८ जणांसोबतच्या अफेअरच्या बातम्या आल्या आहेत. या ८ लोकांमध्ये अभिनेता जंपिंग जॅक म्हणून प्रसिद्ध असलेले जितेंद्र, किरण कुमार, विनोद मेहरा, अमिताभ बच्चन, मुकेश अग्रवाल (उद्योगपती), राज बब्बर, संजय दत्त आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे. त्यापैकी काही महिन्यांनी आ’त्म’ह’त्या केलेल्या मुकेश अग्रवाल यांच्याशी तिचे लग्नही झाले होते. रेखाचेही विनोद मेहरा यांच्याशी लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.

3. दीपिका पदुकोण – १६ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असलेल्या दीपिका पदुकोणचा सर्वाधिक अफेअर अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे. तिने रणवीर सिंगसोबत प्रेमविवाह केला आहे. मात्र त्याच्या आधी तिचे नाव आणखी ७ जणांशी जोडले गेले. या ७ लोकांमध्ये मॉडेल निहार पंड्या, उपेन पटेल, क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, अभिनेता रणबीर कपूर, उद्योगपती सिद्धार्थ मल्ल्या आणि मॉडेलमधून अभिनेता बनलेला मुजम्मिल इब्राहिम यांचा समावेश आहे.

4. अनुष्का शर्मा – अनुष्का शर्माला चित्रपटसृष्टीत १४ वर्षे झाली आहेत. त्यापूर्वी ती मॉडेल होती. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत तिचेनाव ७ लोकांसोबत जोडले गेले. यामध्ये रॅम्प मॉडेल जोहाब युसूफ, अभिनेता रणवीर सिंग, रणबीर कपूर, शाहिद कपूर, क्रिकेटर सुरेश रैना, अभिनेता अर्जुन कपूर आणि क्रिकेटर विराट कोहली यांचा समावेश आहे. अनुष्काने आता विराटशी लग्न केले असून ती एका मुलीची आई बनली आहे.

5. प्रिती झिंटा – ४७ वर्षीय प्रीती झिंटाचे नाव ७ लोकांशी जोडले गेले. यामध्ये मॉडेल मार्क रॉबिन्सन, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली, भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग, उद्योगपती नेस वाडिया, आर्थिक विश्लेषक जीन गुडइनफ यांचा समावेश आहे. प्रिती झिंटाने जीन गुडइनफशी लग्न केले आहे आणि आता ती जुळ्या मुलांची आई आहे.

6. कतरिना कैफ –  २००३ मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कतरिना कैफने विकी कौशलसोबत प्रेमविवाह केला. विकीच्या आधी, सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आणि उद्योगपती सिद्धार्थ मल्ल्या या इतर ५ लोकांसोबतच्या तिच्या जवळीकतेची चर्चा केली गेली.

7. राखी सावंत – कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत हिने ६ जणांना डेट केले आहे. यामध्ये डान्स कोरिओग्राफर अभिषेक अवस्थी, ‘राखी का स्वयंवर’ फेम अलेश पारुजनवाला, वादग्रस्त सोशल मीडिया कॉमेडियन दीपक कलाल, एन’आर’आय उद्योगपती रितेश सिंग, टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला आणि उद्योगपती आदिल दुर्रानी यांचा समावेश आहे. राखीने रितेशसोबत लग्न केल्याचा दावा केला असला तरी ती सध्या आदिलला डेट करत आहे.

8. सुष्मिता सेन – उद्योगपती अनिल अंबानी, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट, अभिनेता रणदीप हुडा, चित्रपट दिग्दर्शक मुदस्सर अजीज, हॉटमेलचे संस्थापक शब्बीर भाटिया, हॉटेल मालक संजय नारंग, उद्योगपती इम्तियाज खत्री, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम,

सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सजदेह, रेस्टॉरंट मालक हृतिक भसीन मॉडेल रोहमन शॉल आणि ललित मोदी यांच्याशी नावं जोडली गेली आहेत. यापैकी संजय नारंग आणि रोहमन शॉलसोबत तिच्या लग्नाची तयारी सुरू होती. पण तिथपर्यंत पोहोचण्याआधीच नातं तुटलं. सध्या सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचं नातं चर्चेचा मोठा विषय बनला आहे.

9. कंगना रनौत – आपल्या वक्तव्यांनी, मतांनी अनेकदा चर्चेचा विषय ठरणारी कंगना गेल्या १६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असून ५ लोकांशी तिचे नावं जोडले गेले. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते आदित्य पांचोली, अध्यायन सुमन, अजय देवगण, ब्रिटिश डॉक्टर निकोलस लाफर्टी आणि हृतिक रोशन यांचा समावेश आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.