Headlines

अल्लू अर्जुन आणि रश्मीका यांच्या पुष्पा चित्रपटाची कमाई बघून वेडे व्हाल, तब्बल एवढी केली कमाई !

एखादा चित्रपट मुळ भाषेशिवाय डब होऊन अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित केला जातो. पण त्या सर्वच चित्रपटांना यश मिळते असे नाही. पण सध्या मुळचा साउथ कडील असलेल्या पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला मात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. हा चित्रपट बॉ़क्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडत असल्याचे दिसुन येते. प्रदर्शनानंतर १८ व्या दिवशी या चित्रपटाने ३०० करोडचा गल्ला पार केला आहे.

तर  या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ६५ करोड रुपये कमावले आहेत. हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला असुन तो १७ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर दुसरीकडे रणवीर आणि दिपिका यांचा १९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित असलेला ८३ हा चित्रपट प्रदर्शित झाला. देशभरातील सर्व क्रिकेटप्रेमी या चित्रपटासाठी सिनेमागृहात गर्दी करतील अशी आशा होती मात्र पुष्पाच्या मानाने असे काही घडले नाही.

खरेतर २४ डिसेंबरला ८३ रिलीज झाल्यावर कोरोना केसेस् अचानक वाढु लागल्या. त्यामुळे लोक जास्त थिएटरमध्ये जात नाही असे म्हटले जात होते. मात्र पुष्पा सिनेमाचा दुसरा आठवडा चालु असुन देखील तो हाऊसफुल असायचा. याचाच अर्थ प्रेक्षक ८३ ला पाठ दाखवुन पुष्पा सिनेमाला पसंती दाखवत होते. विशेष म्हणजे हिंदी प्रेक्षकांकडुन एवढी कमाई होईल अशी आशा नसल्याने स्वता अल्लु अर्जुनला देखील याबाबतीत हैराण झाला आहे.

पुष्पा हा चित्रपट इंडियन मल्टी जॉनरा फॉर्मेटवर आधारित आहे. या चित्रपटात गाणी, अॅक्शन, फाईटींग सीन्स, ड्रामा, रोमान्स आणि ह्युमर या सर्व गोष्टी ठासुन भरल्या आहेत. म्हणजेच पाच वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहणाऱ्या माणसांना एकाच चित्रपट या सर्व गोष्टी पाहण्यास मिळतील. असे चित्रपट हे फुल पैसा वसुल असतात असे भारतीय प्रेक्षकांचे म्हणणे आहे. पुष्पा हिट होण्यापाठी सुद्धा हेच कारण असावे असे अल्लु अर्जुन ला वाटते. पिंकविला शी बोलताना अर्जुनने या चित्रपटाच्या इंडियन मल्टी जॉनरा फॉर्मेटबद्दल सांगितले.

कुतुहलाची गोष्ट म्हणजे पुष्पा प्रदर्शित झाल्यावर त्य़ाचे फारसे कौतुक झाले नव्हते. रिव्ह्युज् मध्ये देखील त्याला केवळ ३ स्टार मिळाले होते. पहिला आठवडा गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या सोमवार पासुन अचानक या चित्रपटाचा ग्राफ वाढु लागला. त्यावेळी ८३ रिलिज झालेला. असे म्हणतात कि हिंदी व्हर्जनच्या प्रेक्षकांनी रिव्ह्यु आणि माऊश पब्लिसिटीमधुन हा चित्रपट पुढे आणला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला दुसऱ्या आठवड्यातच ऑफिशिअली हीट असे घोषित करण्यात आले होते. स्पायडर मॅन आणि ८३ सारखेल  तगडे चित्रपट समोर असुन देखील पुष्पाने बॉक्स ऑफिसवर ६५ करोड रुपयांचा गल्ला जमावला.

या चित्रपटाच्या कहाणी नुसार हिरो पुष्पराज म्हणजेच अल्लु अर्जुन कुलीचे काम करणारा दाखवण्यात आला आहे. पुष्पाचे बालपण खुप हालखीचे होते. तो एका लग्न न झालेल्या आईचा मुलगा असतो. त्यामुळे समाजात त्याला इज्जत मिळत नसते. म्हणुन तो त्याचे नाव मोठे करण्याचा निर्धार करतो. पैसे आणि नाव काम कमावण्याच्या हव्यासे पोटी तो लाल चंदनाची तस्करी करु लागतो. हळुहळु पुष्पा या धंद्यात नाव आणि पैसा कमावु लागतो पण दुसरीकडे पोलिसांच्या भीतीने लोक हा धंदा सोडुन जात असतात पण पुष्पा मात्र त्याच्या हुशारीने वाचत येत असतो.

याच दरम्यान पुष्पाची श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदनासोबत लव्ह स्टोरी सुद्धा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. ही कहाणी जरी साधी असली तरी त्याचा स्क्रिन प्ले आणि दिग्दर्शकाची पात्रांची मांडणी यामुळे या चित्रपट उजवा ठरला आहे. पुष्पाचा पहिला पार्ट पाहिल्यानंतर लोक आता त्याच्या दुसऱ्या पार्टच्या प्रतिक्षेत आहेत.

बॉक्स ऑफिसइंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी बॉक्स ऑफिसवर ८३ चित्रपटाचे कलेक्शन ड्रॉ झाले होते. तर पुष्पामध्ये किरकोळ फरक दिसुन आला. त्यामुळे पुष्पा ८३ च्या पुढे निघुन गेल्याचे दिसुन येत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !