Headlines

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला तिच्या सुरुवातीच्या काळात आई बाबामुळे ऐकाव्या लागल्याच्या या गोष्टी, खूप वर्षानंतर धक्कादायक खुलासा !

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मोठी लेक अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवीने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत तिच्या करीअर संबंधी काही गोष्टींचा खुलासा केला. तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिचा सगळे आयते एका ताटात मिळाले जे खरेतर तिच्या हक्काचे ही नव्हते असे अनेकांनी म्हटले.

मुलाखतीत जान्हवी म्हणाली, माझ्या ध़डक आणि गुंजन या चित्रपटांदरम्यान अनेकजणांनी मला जे काही मिळाले आहे एकत्रच एका ताटात आयते मिळाले आहे. त्या गोष्टींसाठी मुळात मी पात्र नाही. माझे स्वताचे असे काहीच नाही. माझ्या आईवडिलांनी जे काम केले त्यामुळे मी हे दिवस पाहत आहे असे अनेकांचे म्हणणे होते.


खरेतर जेव्हा लोक माझ्या आईवडिलांचा उल्लेख करुन म्हणायचे तेव्हा मला माझ्या आईवडिलांबद्दल खूप आदर वाटायचा आणि खूप अभिमान वाटायचा की मला त्यांच्यामुळे काम मिळाले. पण खरेतर मला अभिनय खूप आवडतो आणि मी त्याचसाठी जगते.

गुड लक जेरीबद्दल जान्हवीने सांगितले की या चित्रपटासाठी माझ्या उच्चारणावर आणि भाषेवर ट्रेनिंग घेतली. बिहारी भाषा ही खूप गोड आहे. त्या भाषेची एक विशिष्ठ लय आहे. एकदा का तुम्ही ती लय पकडली की मग तुम्ही त्यातून बाहेर पडणे मुश्किल होऊन जाते. या चित्रपटात मी एका बिहारी मुलीची भूमिका साकारली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !