Headlines

वयाच्या ४८ व्या वर्षी काजोल बनणार परत आई? व्हायरल फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेला उधाण !

बॉलीवूडमध्ये करिअर बनवणे अभिनेत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तसेच संघर्षाची बाब आहे. जिम अशी जागा आहे, जेथे प्रत्येक अभिनेता फीट व तंदुरुस्त बनण्यासाठी तासन तास व्यतीत करत असतात, त्याचबरोबर बॉलीवूडच्या अनेक अशा काही अभिनेत्रीने प्रेग्नेंसी दरम्यान देखील काम केलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील प्रसिद्ध स्टारकास्ट अजय देवगन आणि काजोल यांच्या बद्दल सांगणार आहोत. या दोघांनी देखील बॉलीवूड क्षेत्रामध्ये आपले आगळे नाव तयार केलेले आहे. आपली विशेष ओळख बनवलेली आहे. हे दोघेही व्यक्तिगत जीवनामध्ये खूपच साधे जीवन जगतात तसेच या दोघांना दोन मुले देखील आहेत.

तुम्हाला काजोल बद्दल सांगायची काही गरज नाही. काजोल ने आत्तापर्यंत बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये वेगळे चित्रपट तयार केलेले आहे. डीडीएलजेपासून ते अनेक चित्रपट केलेले आहेत. सिमरन म्हणून देखील काजोल ला ओळख मिळालेली आहे. काजोल ने अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख तर बनवली आहे

पण त्याचबरोबर चित्रपट विश्वात प्रोडूसर म्हणून देखील तिने काम केलेले आहे, त्याचबरोबर काजोल आणि अजय देवगन ची मुलगी न्यासा देवगन देखील काही ना काही निमित्ताने माध्यमांसमोर आपल्याला आलेली पाहायला मिळते. नुकतेच बोल्ड ड्रेस घातल्यामुळे न्यासा देवगन देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल झालेली आपल्याला पाहायला मिळाली होते. न्यासाचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.

दुर्भाग्याने काजलच्या बाबतीत एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आलेली आहे. सोशल मीडियावर युजर्स मोठ्या प्रमाणावर या काजोलचा एक व्हिडिओ शेअर करत आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले तर काजोल तिसऱ्यांदा आई बनणार आहे असे दिसून येत आहे.

ही बातमी समोर येताच बॉलीवूडमध्ये आहाकार माजला आहे. प्रत्येक जण या बातमीबद्दल सत्यता तपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रयत्न देखील करत आहेत, त्याचबरोबर खरंच अभिनेत्री काजोल आई बनणार आहे का? असे प्रश्न देखील अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काजल आपल्याला प्रेग्नेंट दिसत आहे. अफवानुसार, लवकरच काजोल तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे परंतु आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नुकतेच धर्मा प्रोडक्शन चे सीईओ अपूर्वा मेहताच्या बर्थडे पार्टी मध्ये काजोल आलेली होती. या पार्टीनंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर वायरल झाले आहेत.