सध्या सर्वत्र पठाण चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी वादाच्या कचाट्यात सापडलेल्या पठाण चित्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. या चित्रपटाने आतापर्यंतच्या कमाईचा सर्व विक्रम मोडीत काढला असून एक नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटातून किंग खान म्हणजेच शाहरुखने तब्बल 4 वर्षांनी चित्रपटात पुनरागमन केले. व तो कशाप्रकारे बॉलिवूडचा खऱ्या अर्थाने बादशहा आहे हे सिद्ध केले.
चित्रपट प्रदर्शनापूर्वी बॉयकॉठ पठाण या हॅशटॅगने रि ओढली होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र त्याने एक दोन नाही तर तब्बल 20 रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आमिर खान, अक्षय कुमार यांसारख्या सुपरस्टार्सला जे जमले नाही. ते यावर्षी शाहुरुख खानने करुन दाखवले आहे. मात्र काही लोकांनी पठाणच्या प्रसिद्धी व यशावर संशय व्यक्त केला आहे. तसेच पठाणच्या टीमने वाढवून आकडा सांगितल्याचा आरोप त्यांच्यामार्फत करण्यात आला आहे.
पहिल्या दोन दिवसांच्या रेकॉर्डपाठी तिकीट दरांमध्ये केलेली वाढ हे एक मुख्य कारण असल्याचे म्हटले जाते. मुंबईतील मराठा मंदिर आणि गेटी गॅलेक्सी सारख्या काही मोजक्या सिनेमागृहांना सोडल्यास या चित्रपटाच्या तिकीटावर 500 रुपयांवरुन 2800 रुपयांची वाढ झाली आहे. ही एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे. पण शाहरुख खानने हे सर्व कसे काय हाताळले. यामागे काही कारणे आहेत चला जाणून घेऊ,
पहिले कारण – गेली काही वर्षे जो चित्रपट सर्वांत जास्त गोंधळ निर्माण करतो तोच पुढे जाऊन सर्वाधिक कमाई करतो असे चित्र पाहायला मिळते. पठाणच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. बेशर्म रंग या गाण्यात दीपिकाच्या भगव्या बिकीनीवरुन मध्यंतरी वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणात अनेक राजकारणी, धार्मिक लोकांनी उडी घेऊन शाहरुख, दीपिकाच्या चारित्र्यावर चिखल फेक केली.
काहींनी तर त्यांचे दहावे बारावे घातले. काहींनी कलाकारांना जीवंत जाळण्याची धमकी दिली. सेंसोरकडे गेल्यावर या चित्रपटात काही बदल सांगितले गेले. ते केल्यावरच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. काही अंशी निगेटीव्ह पब्लिसिटी ही अनेक चित्रपटांना फायदेशीरच ठरली आहे. ही गोष्ट पठाणच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाली.
दुसरे कारण – शाहरुखने कुठेच मुलाखत दिली नाही. मात्र तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत होता. शाहरुखने ट्विटरवर ‘AskSRK’ ट्रेंड सुरु केला व त्यामार्फत चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
तिसेर कारण – पठाण चित्रपटात सलमान खानला पाहुणा कलाकार म्हणून दाखवण्यात आले होते. इतक्या वर्षांनी या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पाहण्याची सुवर्ण संधी आली होती. त्यामुळे हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !