Headlines

शाहरुख खानची दुसरी बायको व्हायचंय उर्फी जावेदला, खुलेआम केलं असं कि पाहून शाहरुख लाजेल !

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे.

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. काहींना या चित्रपटाची कथा आवडली तर काहींना शाहरुखचे चित्रपटातील अॅक्शन सीन्स आवडल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळीकडून शाहरुखचे कौतुक होत असताना त्यात सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कशी मागे राहिल.

तिनेही धावत्या गंगेत हात धुवत ‘पठाण’ चित्रपटाचे कौतुक केले आणि शाहरुख खानबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. उर्फी जावेदने सोशल मीडियावर अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकल्यानंतर खुद्द शाहरुख खानलाही लाज वाटेल.

‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन दिवस झाले आहेत, मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते दररोज चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. लोक शाहरुख खानचे कौतुक करत आहेत. दरम्यान, सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने शाहरुख खानबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. उर्फी जावेदचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

उर्फी म्हणाली- ‘’शाहरुख मला तुझी दुसरी पत्नी बनायचे आहे’’. सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने उर्फी जावेदचा एक लेटेस्ट व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील वांद्रे भागातील आहे. यादरम्यान, तिने पापाराझींना फोटोसाठी पोज दिल्या तसेच ‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरुख खानचे कौतुकही केले. उर्फी जावेदने किंग खानसाठी म्हटले की, माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. एवढेच नाही तर तिने शाहरुख खानची दुसरी पत्नी होण्याची इच्छाही व्यक्त केली. तिचे म्हणणे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्व पापाराझी जोरजोरात हसू लागले.

उर्फी जावेदचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यानंतर एका पापाराझीने उर्फी जावेदला शाहरुख खानबद्दल काय म्हणशील असे विचारले, यावर उर्फी म्हणली – मला शाहरुख खान अजिबात पाहणार नाही, पण मला शाहरुख खान खूप आवडतो. मला शाहरुख खानची दुसरी पत्नी बनायचे आहे.. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

शाहरुख खानने आपल्या रोमँटिक व्यक्तिरेखेपेक्षा थोडे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न पठाण चित्रपटात केला आहे. या चित्रपटात बरीच अॅक्शन दृश्ये दिली आहेत. चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्लचे फलक पाहायला मिळत आहेत. अनेक चित्रपटगृहांमध्ये ऑनलाइन तिकिटे अजिबात उपलब्ध नाहीत. ‘पठाण’ हा चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जगभरात विक्रमी 8,000 स्क्रीनवर दाखवला जात आहे.

‘पठाण’ने 2 दिवसात 200 कोटींची कमाई केली, मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसात जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘पठाण’ चित्रपटानंतर आता शाहरुख खान लवकरच ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ चित्रपटांची प्रसिद्ध नायिका नयनतारा दिसणार आहे. यानंतर शाहरुख खान बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य नायिका असणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !