Headlines

हा छोटा मुलगा आता करतोय बॉलिवूडवर राज, आत्ताच झाले आहे बॉलिवूड मधील टॉपच्या अभिनेत्री सोबत लग्न !

इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना बॉलिवुड मध्ये खुप स्ट्रगल केल्यावर खुप वेळाने खरी ओळख मिळाली. इंडस्ट्रीमध्ये कोणी बॅकबोन नसुन देखील हे कलाकार स्वताचा ठसा उमठवण्यात यशस्वी होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत.

फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्याने २०१२ मध्ये बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख २०१६ मध्ये मिळाली. त्यावेळी त्याला अशी काही प्रसिद्धी मिळाली ज्यामुळे तो आता इंडस्ट्रीच्या टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त त्याने गेल्याच वर्षी बॉलिवुडच्या टॉपच्या अभिनेत्रीसोबत लग्न केले.

या फोटोतील लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसुन अभिनेता विकी कौशल आहे. त्याने २०१२ मध्ये गैंग्स ऑफ वासेपुर मधुन बॉलीवुड डेब्यू केला होता. पण त्याने या चित्रपटात अभिनय नाही तर असिस्टेंट डायरेक्टरचे काम केले होते. त्याच वर्षी तो लव शव ते चिकन खुराना चित्रपटात दिसला. २०१५ मध्ये विकीने मसान चित्रपटात लीड रोल केला. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या फार पसंतीस पडला होता. त्यामुळे त्याचे खुप कौतुक सुद्धा झाले. त्य़ानंतर त्याने जुबान, रमन राधव 2.0, लव पर स्क्वायर फीट हे सिनेमे केले. आलिया भट्टची प्रमुख भुमिका असलेल्या राजी चित्रपटात सुद्धा विक्की ने काम केले. यानंतर त्याने मागे वळुन पाहिले नाही.

विक्कीने उरी द सर्जिकल स्ट्राइक मध्ये काम केले. या चित्रपटासाठी त्याला नॅशलन अवॉर्ड सुद्धा मिळाला. सरदार उद्धम हा त्याचा सर्वात शेवटी प्रदर्शित झालेला चित्रपट. विकीचे गोविंदा मेरा नाम, द ग्रेट इंडियन फैमिली आणि लक्ष्मण उत्तेकर हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

विकीने डिसेंबर २०२१ मध्ये अभिनेत्री कैटरीना कैफ सोबत लग्न केले. हे लग्न म्हणजे एक प्रकारचा भव्य सोहळाच होता. लग्नानंतर दोघे मालदीवला हनीमूनसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत नवे घर घेतले व तेथे शिफ्ट झाले. दोघे ही कामातुन जसा वेळ मिळेल तसा एकमेकांसोबत वेळ घालवतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !