Headlines

क्रिकेटर रविंद्र जडेजाचे घर आहे खूपच सुंदर, पत्नी आणि परिवारासोबत राहतो आरामात !

भारतीय क्रिकेट संघाचा एक हुशार आणि टॅलेंटेड खेळाडू रवींद्र जडेजाने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळेच त्याला केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील महान खेळाडूंमध्ये गणले जाते.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर क्रिकेटपटूच्या घराचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. त्याचे भव्य दिव्य घर पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे. रवींद्र जडेजा एका आलिशान घरात राहतात. त्याचे घर पाहून अनेक जण त्याचे कौतुक करतात.

रवींद्र जडेजा ची पत्नी पूर्वी निवडणुकीला उभी होती. विशेष म्हणजे त्यातून ती निवडून सुद्धा आली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जडेजा ने आपल्या पत्नीला भरपूर मदत केली होती. जडेजा अनेकदा आपल्या पत्नीसोबतचे घरातले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यातून त्याच्या घरातील इंटेरियर पाहायला मिळते. ते फारच अप्रतिम सजवण्यात आले आहे.

रवींद्र जडेजाला एक महागडा खेळाडू म्हणून सुद्धा ओळखले जाते. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा ची संपत्ती १०० करोड रुपयांहून अधिक आहे. २०२२ मध्ये जेव्हा खेळाडूंच्या एकूण संपत्तीचे आकडे समोर आले तेव्हा सर्वाधिक संपत्ती असलेल्या खेळाडूंमध्ये जडेजाचे नाव सुद्धा होते. जडेजाने एक नवीन बंगला सुद्धा बांधला आहे. या बंगल्याचे इंटिरियर विदेशी सामानाने सजवले असून ते फारच किंमती आहे. त्याचा बंगला चार मजली आहे.

या घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर तो आपल्या पत्नी सोबत राहतो. दुसऱ्या मजल्यावर त्याचा परिवार राहतो. त्याच्या घराची व संपत्तीची तुलना जगातील श्रीमंत व्यक्तींसोबत केल्यास काहीच हरकत नाही असे म्हणावे लागेल.