Headlines

अमिताभ बच्चन यांची भाडेकरू बनली कृती सॅनॉन, महिन्याचे भाडे ऐकून दंग व्हाल !

बॉलिवुड स्टार हे त्यांच्या चित्रपटांमधुन जाहिरातींतुन भरपुर पैसे कमावत असतात. आणि ते मिळालेले पैसे ते बरेचदा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात. काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांची एक प्रॉपर्टी बॅंकेला दिल्याची चर्चा होत होती. आता अमिताभ यांनी त्यांची आणखी एक प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे. अमिताभ यांनी त्यांचा ड्युप्लेक्स फॅल्ट बॉलिवुड अभिनेत्री क्रिती सेननला भाड्याने दिला आहे. यासाठी क्रितीसुद्धा भरभक्कम भाडं देणार आहे.

क्रिती अमिताभ यांना दरमहा दहा लाख रुपये भाडं देणारं आहे. हा फ्लॅट २७ आणि २८ व्या मजल्यावर आहे. तसेच तत्पुर्वी तिनी ६० लाख रुपये सिक्युरिटी मनी दिले आहेत. कृती त्या घरात २ वर्षे राहणार आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये अमिताभ आणि अभिषेक यांनी त्यांची जुहु येथील प्रॉपर्टी स्टेट बॅंक ऑफ इंडीयाला भाड्याने दिली. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ यांनी १५ वर्षांसाठी ती जागा बॅंकेला भाड्याने दिली आहे. दर पाच वर्षांनी त्या प्रॉपर्टीची भाडेवाढ होईल. त्यांनी त्यांची ३१५० स्क्वेअर फुट वाली ग्राउंड फ्लोअरची प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने अमिताभना आगाऊ रक्कम आधीच दिली आहे.

अमिताभ सारख्या इतर कलाकारांनी सुद्धा त्यांची प्रॉपर्टी तगड्या किंमतीला भाड्याने दिली आहे. सलमान बाबत सुद्धा म्हटले जाते कि त्याने गॅलेक्सी अपार्टमेंट शिवाय वांद्रे येथे आणखी एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला आहे. त्या फ्लॅटसाठी तो दरमहा ८.२५ लाख रुपये भाडे देतो. तसेच त्याने आणखी एक प्रॉपर्टी ११ लाख रुपयांना भाड्याने घेतली आहे. तिथे त्याच्या फर्मसाठी काम करणारी लोक, लेखक वगैरे काम करतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !