टिव्हीवर मोठ्यांसोबतच लहान मुलांचे कार्यक्रमसुद्धा प्रसिद्ध आहेत. एक काळ असा होता जेव्हा मोठी माणसं देखील लहान मुलांचे शो अगदी आवड़ीने बघायचे. कारण त्या काळी लहान मुलांच्या कार्यक्रमांचा दर्जादेखील उत्तम होता. १९ वर्षांपुर्वी लहान मुलांचा एक कार्यक्रम यायचा शकालाका बुम बुम. या शो मध्ये जादुच्या पेन्सिलची करामत दाखवली जायची. त्या काळी लहानांसोबत मोठ्यांनादेखील हा शो खुप आवडायचा. त्या काळी या कार्यक्रमात दिसणारे अनेक बालकलाकार आता इंडस्ट्रीमधले नामवंत कलाकार बनले आहेत. त्यातीलच एक म्हणजे संजु , किंशुक वैद्य.
शका लका बुम बुम या कार्यक्रमात किंशुकचा लीड रोल होता. संजु या पात्रामुळे त्याला खुप लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील संजुला एक जादुची पेन्सिल मिळते जिचा वापर तो लोकांची मदत करायला करतो अशा या कार्यक्रमाची कथा होती.
सध्या तो लहानगा संजु काय करतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल त्याच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. मिडिया रिपोर्टस् मध्ये मिळालेल्या माहितीनुसार किंशुक सध्या अभिनय क्षेत्रातच स्वताचे नशिब आजमावुन पाहत आहे. तो आता २८ वर्षांचा झाला असुन अभिनय क्षेत्रातच तो खुप अॅक्टिव्ह असतो. शका लका बुमबुम नंतर राधा कृष्ण आणि एक रिश्ता पार्टनरशिप का मधील त्याची भुमिका लोकांना खुप आवडली होती.
किंशुकने अजय देवगण सोबत राजु चाचा या चित्रपटात सुद्धा काम केले आहे. शका लका बुम बुम या कार्यक्रमात किंशुक सोबत जेनिफर विंगेट आणि हंसिका मोटवानीने सुद्धा काम केलेले. या दोन्ही अभिनेत्री सध्याच्या इंडस्ट्रीमधल्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत.
हंसिका सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहे तर जेनिफर टिव्ही इंडस्ट्रीमधली सुंदर अभिनेत्री म्हणुन ओळखली जाते. तिने आता पर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. किंशुकने जुर्म का चेहरा या कार्यक्रमाला होस्ट केले हा कार्यक्रम द क्यु या चॅनलचा पहिला क्राइम फिक्शन शो आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !