Headlines

ना गाडी, ना घोडा बुलडोझरवर निघाली लग्नाची वरात, सोशल मीडियावर फोटोंनी घातला धुमाकूळ !

हल्ली लग्नाचा हंगाम आहे. तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्न करायला सुरू होते. प्रत्येक जण लग्न हा समारंभ आपल्या ऐपतीनुसार करत असतो, परंतु हल्ली लग्न वेगवेगळ्या पद्धती ने करण्याची स्टाईल आहे व एक ट्रेण्ड देखील निर्माण झालेला आहे. हा ट्रेंड अनेकजण फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतात, तसे पाहायला गेलं तर लग्नाचा सीजन हा जून महिन्यापर्यंत असतो परंतु लग्न करायचं म्हटलं तर त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचे नियोजन करावे लागते.

हॉल मंडप पासून ते वरातीपर्यंत या सर्वांची काळजी आपल्याला घ्यावी लागते, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असे काही लग्न घडताना पाहायला मिळतात. ज्यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असते. ही चर्चा त्या लग्नाचे लक्ष वेधून घेते. लग्न समारंभामध्ये नवरदेवाची वरात हा एक चर्चेचा विषय असतो. अनेक जण या वरातीमध्ये घोडा गाडी यांचा समावेश करत असतात आणि लग्न धुमधडाक्यात नवरीच्या दारापर्यंत किंवा लग्न मंडपापर्यंत आणत असतात.

परंतु आज आम्ही तुम्हाला एका नवरदेव बद्दल सांगणार आहोत, ज्या नवरदेवाने स्वतःच्या लग्नाची वरात चक्क बुलडोजर वर नेलेली आहे. ही नवरदेवाची वरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या वरातीचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि पुन्हा एकदा या लग्नाच्या हंगामामध्ये या नवरदेवाने केलेली लग्न चर्चेचा विषय बनलेला आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही वरात गुजरात मधील नवसारी जिल्ह्यातील कलियारी गावातील आहे. या ठिकाणी आदिवासी धोरिया समाजाचे केवल पटेल यांनी आपल्या लग्नाची वरात जेसीबी म्हणजेच बुलडोजरवर काढली. माध्यमांच्या अहवालानुसार ही एक वेगळी वरात आहे, असे मानले जात आहे.

या नवरदेवाला आपल्या लग्नात काहीतरी हटके करायचे होते आणि म्हणूनच त्याने जेसीबीचा उपयोग वरातीसाठी केला. सगळेजण आपल्या लग्नामध्ये गाडी घोडे घेऊन येतात परंतु या नवरदेवाने खोदकामासाठी उपयोगी पडणाऱ्या जेसीबीचा वापर करण्याचा विचार केला. या वरातीचा व्हिडिओ युट्युब वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

अशाप्रकारे लग्नाची वरात काढण्याचे कारण नवरदेवाला विचारले असता नवरदेव म्हणाला की, मी युट्युब वर एक व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओमध्ये पंजाब मधील एका नवरदेवाने बुलडोझरवर आपली वरात काढली होती आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या मनात देखील असे करण्याचे विचार आले आणि त्यानंतर मी ठरवले की आपले लग्न अगदी सगळ्या वेगळ्या पद्धतीने करायचे, जेणेकरून लग्नाची चर्चाही झाली पाहिजे म्हणूनच युट्युब वर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी देखील माझ्या लग्नाची वरात जेसीबी वर काढली.

नवरदेवाच्या असे वागण्यामुळे स्थानिक लोक आणि प्रत्यक्ष वर मुलगी हैराण झाली,अशा प्रकारची आगळीवेगळी वरात पाहून वधू कडच्या मंडळींना देखील घाम फुटला. लग्नाच्या वरातीमध्ये महागड्या गाडींना सजवले जाते त्याच पद्धतीने जेसीबीला देखील फुलांनी सजवले गेले. ढोल आणि डीजेच्या जोडीला वरात वधूच्या घरी पोहोचली,तेव्हा हा सगळा प्रकार पाहून तेथील स्थानिक लोक देखील आश्चर्यचकित झाले, अशावेळी काही लोकांनी वरातीचे व्हिडिओज बनून सोशल मीडियावर शेअर केले.

काही दिवसातच हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्या व्हिडिओबद्दल वेगवेगळ्या चर्चा देखील होऊ लागल्या आणि हे लग्न प्रसिद्ध झाले. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला. आपल्या मित्र आप्तेष्ठांना देखील शेअर केला तसेच अनेकांनी नवरदेवाच्या या प्रयत्नाचे कौतुक देखील केले आणि त्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा देखील दिल्या..