Headlines

अभिनेत्री कॅटरिना कैफने भर कार्यक्रमात सुहागरात्रीबद्दल सांगितले म्हणाली सुहागरात म्हणजे फक्त रात्र नसते रात्र आणि दिवस विकी फक्त … !

लग्नाची पहिली रात्र ही नवरा नवरीच्या आयुष्यातील खास रात्र असते. किंबहुना इतर लोकही त्यांच्या पहिल्या रात्रीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. अशातच जर एखाद्या मोठ्या सेलिब्रेटीची पहिली रात्र असेल तर मग चाहत्यांना त्यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यास उत्सुकता असते. काही दिवसांपूर्वीच कॉफी विथ करणच्या ७ व्या सीझनमध्ये आलिया आणि रणवीरने आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचे काही किस्से सांगितले.

आलियाने करण जोहरच्या शोमध्ये सांगितले की, सुहागरात वगैरे अशा काहीच गोष्टी नसतात. अलिआच्या अशा बोलण्यावरुन तिने आणि रणबीरने त्यांची पहिली रात्र साजरी केलीच नाही असा अंदाज सगळ्यांनी लावला. त्यानंतर करणने अभिनेत्री कतरिना कैफ जेव्हा त्याच्या शोमध्ये आलेली तेव्हा सुद्धा तोच प्रश्न तिला विचारला.

कतरिना कैफ आणि विकी कौशलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले होते.. त्यांच्या हनिमून व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. अशा परिस्थितीत जेव्हा करणने कतरिनाला शोमध्ये तिच्या हनिमूनबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्रीने अतिशय धक्कादायक उत्तर दिले.

नुकताच ‘कॉफी विथ करण सीझन 7’ च्या दहाव्या भागाचा प्रोमो समोर आला आहे.यामध्ये ‘फोन भूत’ चित्रपटाची स्टारकास्ट आलेली पाहायला मिळते. यावेळी कतरिना इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत शोमध्ये आली होती. शोमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रहस्येही उघड केली. हनिमूनच्या प्रश्नावर कतरिनाने सांगितले की, प्रत्येकवेळी सुहागरातच असली पाहिजे असे गरजेचे नाही. काही वेळेस सुहागदिन सुद्धा असू शकतो.

कतरिनाचे हे बोलणे ऐकून इशान आणि सिद्धांतला मोठा धक्का बसला. तिचेहे उत्तर करणलाही आवडले. आता कतरिनाचे हे अनोखे उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

कतरिना आणि आलिया चांगल्या मैत्रिणी आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न ९ डिसेंबर २०२१ ला झाले. तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या काही महिन्यांनंतर म्हणजेच 14 एप्रिल 2022 ला लग्न केले. विशेष म्हणजे एकेकाळी रणबीर आणि कतरिना गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड होते. असे असूनही आता आलिया आणि कतरिना चांगल्या मैत्रिणी आहेत.

कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिचा फोन भूत हा चित्रपट याच वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात कतरिना व्यतिरिक्त ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. गुरमीत सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा एक हॉरर कॉमेडी ड्रामा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !