सिनेमांमध्ये सुंदर सुंदर कपडे घालून काम करणे, प्रेक्षकांकडून आपले कौतुक होणे, जागतिक स्तरावर आपली ओळख होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशातच जर आपल्याला तशी संधी मिळाली तर काय विचारयलाच नको.आणि ती संधी जर यशराज बॅनरकडून मिळाली तर त्या कलाकारासाठी सोन्याहून पिवळे असेच म्हणावे लागेल.
यशराज बॅनरमुळे अनेक सिनेकलाकारांचे करीअर बनले आहे. असेच स्वप्न अभिनेत्री ट्युलिप जोशीचे होते जे ‘मेरे यार की शादी है’ या चित्रपटातून पूर्ण झाले. पण, एवढ्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटातून पदार्पण करूनही ट्युलिप आपले करिअर करू शकली नाही. 13 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत, ट्यूलिपने सुमारे 14 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यातला एकही चित्रपट सुपरहिट झाला नाही. हिंदी व्यतिरिक्त तिने तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले, परंतु तिथेही तिला फारसे यश मिळाले नाही. आज 11 सप्टेंबरला ट्यूलिप तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.
ट्यूलिपचा जन्म 11 सप्टेंबर 1979 ला मुंबईत झाला. तिचे वडील गुजराती आणि आई आर्मेनियन आहे. ट्यूलिपचे शिक्षण मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून झाले. पुढे तिने विवेक कॉलेजमधून मेजरिंग फूड सायन्स अँड केमिस्ट्रीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. सन 2000 मध्ये, तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता, परंतु विजेतेपद मिळवू शकली नाही. मात्र, त्यानंतर तिला सियाराम, पेप्सी आणि बीपीएल सारख्या अनेक नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम मिळू लागले. नुसरत फतेह अली खानला श्रद्धांजली वाहण्यासाठी बनवलेल्या व्हिडिओमध्येही ती दिसली होती.
ट्यूलिपने 2002 मध्ये यशराजच्या ‘मेरे यार की शादी है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. तिला हा चित्रपट मिळण्यामागची कहाणीसुद्धा खूप रंजक आहे. निर्माता आदित्य चोप्रा एका मित्राच्या लग्नाला गेले असताना त्यांनी पहिल्यांदा ट्यूलिपला पाहिलं. त्याचवेळी आदित्यने ट्यूलिपला ‘मेरे यार की शादी है’साठी ऑडिशन देण्यास सांगितले. पण ट्युलिपला हिंदी नीट येत नव्हते. त्यामुळे आदित्यनेच तिला फिरोज खान स्टुडिओत हिंदीचे प्रशिक्षण दिले.
‘मेरे यार की शादी है’ बद्दल बोलायचे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, पण ट्युलिपला इंडस्ट्रीत खरी ओळख त्याच्या पुढच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मातृभूमी’ या चित्रपटातून मिळाली. हा चित्रपट स्त्री भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयावर आधारित होता, ज्यामध्ये ट्युलिपने कल्कीची भूमिका साकारली होती. चित्रपटात कल्की पाच भावांशी लग्न करते आणि आठवड्यातील प्रत्येक रात्र तिला वेगवेगळ्या भावांसोबत घालवावी लागते.
एवढेच नाही तर लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच सासरच्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते.’मातृभूमी’ बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही, तरीही ट्यूलिपचे तिच्या भूमिकेसाठी आणि चित्रपटातील अभिनयासाठी खूप कौतुक केले गेले.नंतर 2003मध्ये ट्यूलिपने ‘खलनायक’ या चित्रपटाद्वारे तेलुगुमध्ये पदार्पण केले.
यानंतर ट्युलिपचे करिअर बॉलिवूडमध्ये फार काळ टिकले नाही. ट्युलिप जोशीने शाहिद कपूरसोबत ‘दिल मांगे मोर’ चित्रपटात काम केले. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. ट्यूलिपने ‘धोखा’, ‘सुपरस्टार’, डॅडी कूल’, ‘रनवे’, ‘हॉस्टेल’ आणि ‘बी केअरफुल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तेही फ्लॉप झाले.सर्वात शेवटी ती 2014 मध्ये सलमानच्या जय हो चित्रपटात दिसली होती.
पुढे ती 24 ऑगस्ट 2014 ते 1 फेब्रुवारी 2015 दरम्यान एअरलाइन्स या मालिकेत दिसली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच जवळपास 7 वर्षे ती ग्लॅमरस दुनियेपासून दूर आहे. असे असूनही ती सध्या आपल्या वडिलांची 600 करोड रुपयांची प्रॉपर्टी सांभाळत आहे. ती या कंपनीची डायरेक्टर आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !