बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर झगमगत्या बॉलिवूडची काळी बाजू जगासमोर आली. सुशांत चे वडील केके सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पटना पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रिया चक्रवर्ती ची कसून चौकशी होऊ लागली.
हा तपास सी बी आय व एन सी बी कडे सुपूर्त झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. तपासामध्ये या प्रकरणात ड्र ग्स अँगल समोर आल्यावर अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती ला अटक करण्यात आली. रियाने चौकशीमध्ये ड्र ग ॲडिक्ट असलेल्या अनेक कलाकारांची नावे समोर आणली.
यामध्ये प्रामुख्याने अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांचे नाव समोर आले. ड्र ग्ज प्रकरणात अडकलेल्या या अभिनेत्रींना त्यांच्या चॅटवरून एन सी बी ने चौकशीसाठी त्यांना समन्स पाठवले. एन सी बीच्या हाती अभिनेत्री दीपिका पादुकोण ची २०१७ मधील जुनी डिलिट केलेली चॅट लागली आहे.
त्यामुळे व्हाट्सअप मध्ये साठी एंड टू एंड इंक्रीप्शन सारखी एवढी प्रायव्हसी सेटिंग असूनही दीपिकाची ती चॅट एन सी बी च्या हाती ती लागलीच कशी हा प्रश्न उभा ठाकला आहे. याप्रकरणी व्हाट्सअप कडून खुलासा करण्यात आला.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला अटक झाल्यावर तिने बॉलीवूड मधील अनेक कलाकारांची नावे समोर आली. ही नावे समोर आल्यावर त्यांचे जुने व्हाट्सअप चॅट तपासण्यात आले. यामुळे आता अनेक बॉलिवूड स्टार्सच्या अडचणी वाढल्या आहेत. व्हाट्सअप ने दावा केला की, व्हाट्सअप चॅट ही सर्व एंड टू एंड इंक्रीप्शन असते.
एंड टू एंड इंक्रीप्शन म्हणजे ही चॅट केवळ मेसेज पाठवणारा व मेसेज ज्याला पाठवला आहे तीच व्यक्ती वाचू शकते. एवढेच नव्हे तर अगदी व्हाट्सअप देखील ती चॅट वाचू शकत नाही. यामागील कारण म्हणजे ही चॅट कोणत्याच सर्वांमध्ये सेव्ह होत नाही ती केवळ त्या संबंधित व्यक्तींच्या मोबाईल मध्येच असते.
त्या व्यक्तीने जर ती चॅट डिलीट केली तर त्यानंतर ती इतर कोठेही जात नाही. मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणात उलटेच घडले. सर्व अभिनेत्रींच्या व्हाट्सअप चॅट लीक झाल्यामुळे आता कलाकारांच्या व्हाट्सअप प्रायव्हरसीचा प्रश्न समोर आला आहे.
बॉलिवूड कलाकारांची व्हाट्सअप चॅट झाल्यावर लीक झाल्यावर व्हाट्सअप च्या प्रायव्हसीचा प्रश्न समोर आला. त्यामुळे लोकांचा व्हाट्सअप वरील विश्वास थोडाफार तुटत असल्याचे दिसू लागले. त्यामुळे लोकांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी व्हाट्सअप ने या लीक झालेल्या चॅट बाबत खुलासा केला आहे.
व्हाट्सअप ने सांगितले की, एंड टू एंड इंक्रीप्शन व्हाट्सअप वरील सर्व चॅट सुरक्षित ठेवते. मेसेज पाठवणारा आणि ज्याला तो पाठवला आहे तो अशा व्यक्तीं शिवाय ती चॅट कोणीच वाचू शकत नाही. कारण व्हाट्सअप वर फोन नंबर चा वापर करून लॉग-इन केले जाते. याच कारणामुळे स्वतः व्हाट्सअप ला देखील ते मेसेज वाचता येत नाहीत.
व्हाट्सअप कडून ऑपरेटिंग सिस्टिम मॅन्युफॅक्चर्स च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते. यामुळे ती चॅट केवळ फोन मध्येच सेव्ह राहते. लोकांचा चॅट लीक होऊ नये तसेच फोन मधील चॅट दुसरी कोणतीही व्यक्ती वाचू नये म्हणून व्हाट्सअप ने पासवर्ड आणि बायोमेट्रिक आयडी चा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ची टॅलेंट मॅनेजर जया साहासोबत दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्माने चॅट केली होती. हीच चॅट एन सी बी च्या हाती लागली आहे. जयाने तिच्या व्हाट्सअप चॅटचा गुगल ड्राईव्ह वर किंवा एप्पल च्या आयक्लाउड वर बॅकअप घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. कोणताही बॅकअप प्लॅटफॉर्म हा व्हाट्सअप च्या एंड टू एंड इंक्रीप्शन पॉलिसी मध्ये गृहीत धरला जात नाही. म्हणजेच व्हाट्सअँपचा दररोज होणारा बॅकअप हा निष्काळजीपणा केला तर लीक होऊ शकतो.
त्यामुळे तपास संस्था संशयितांच्या फोनचा डाटा दुसऱ्या डिव्हाईस वर कॉपी करून घेऊ शकतात. यासाठी फोन क्लोनिंग तंत्राचा वापर केला जातो. यामुळे एखाद्या व्यक्तीची बॅकअप सहजपणे वाचता येते. अभिनेत्री दीपिका पादुकोण च्या चॅट बाबत देखील असेच काहीसे घडल्याचे सांगितले जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !