Headlines

कोरोना नंतर चीनकडून भारतात ब्रुसीलोसिस नवाचा नवीन बॅकटेरिया, भारतात पण संसर्ग झाल्याची माहिती !

चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसचा हाहाकार दहा महिने उलटून गेले तरीही भारतासह इतर देशात अजूनही चालूच आहे. कोरोनाव्हायरस मुळे संक्रमित झालेल्या लोकांच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा दुसरा नंबर लागतो. कोरोनाव्हायरस जगा मधून जाण्याचे नाव घेत नाही तोपर्यंत दुसरे नवे व्हायरस रुपी संकट उभे ठाकले आहे.

कोरोना नंतर आता चीनमध्ये अजून एक नवा बॅक्टेरिया आजार पसरवत आहे. कोरोनाव्हायरस प्रमाणेच हा बॅक्टेरिया सुद्धा हळूहळू वाढत असून तो खूप घातक ठरत आहे. या नव्या बॅक्टेरियाचे नाव ब्रुसीलोसिस असे आहे.

काय आहे ब्रुसीलोसिस ?
साउथ चाइना मोर्निंग पोस्टने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गांसू प्रांताची राजधानी लान्जो येथे आतापर्यंत ३ हजाराहून अधिक लोक ब्रुसीलोसिस नावाच्या बॅक्टेरियाने संक्रमित झाले आहे. विशेष म्हणजे हा बॅक्टेरिया माणसांसोबत जनावरांना देखील संक्रमित करतो.
ब्रुसीलोसिस हा एक जीवाणूजन्य रोग आहे जो विशेषत: गायी, मेंढ्या, डुक्कर आणि कुत्र्यांना संक्रमित करतो. याची लागण माणसांना सुद्धा होऊ शकते. जर माणसे संक्रमित झालेल्या पशूंच्या संपर्कात आले, किंवा त्यांनी संक्रमित पशूंचे मांस खाल्ले तर त्या व्यक्तीला सुद्धा या बॅक्टेरिया ची लागण होऊ शकते.
श्वासा मार्फत हा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो. प्रत्येक वेळी हा आजार संक्रमित जनावरांमुळे होतो असे नाही. काही वेळेस दूध किंवा पनीरचे सेवन केल्यामुळे देखील हा आजार होऊ शकतो असे डब्ल्यूएचओ चे म्हणणे आहे. मात्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या बॅक्टेरिया ची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे.

डब्ल्यू एच ओ ने दिलेल्या माहितीनुसार हा आजार जगातील काही देशांमध्ये आढळतो. यावर इलाज देखील आहे. महिनाभर औषधोपचार केल्यावर हा आजार बरा होऊ शकतो.

भारत आला आहे का ब्रुसीलोसिस ?
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या आजाराचे संक्रमण आता भारतात देखील झाले असून भारतात काही व्यक्ती व प्राण्यांना बॅक्टेरिया ने संक्रमित केले आहे. त्यामुळे आधीच कोरोनाव्हायरस मुळे चिंताग्रस्त बसलेले वैज्ञानिक आता या नव्या व्हायरसमुळे अजूनच बुचकळ्यात पडले आहे.

हा आजार कोरोना सारखाच अति भयंकर निघाला तर देशासाठी ते घातक ठरेल अशी चिंता सध्या देशातील वैज्ञानिकांना सतावत आहे.

काय आहेत ब्रुसीलोसिसची लक्षणे ?
या आजाराची लक्षणे दिसून येण्यास एक आठवडा ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र साधारणतः दोन ते चार आठवड्यात याची लक्षणे दिसतात. ताप, घाम येणे, थकवा, भूक न लागणे, डोकेदुखी, वजन कमी होणे आणि स्नायू दुखणे ही याची लक्षणे आहेत.

यातील काही लक्षणे खूप काळासाठी जाणवता तर काही कायमस्वरूपी शरीरात आढळतात. जसे की वारंवार ताप, सांधेदुखी, अंडाशयावर सूज येणे, हृदय किंवा यकृत सूज येणे, मानसिक थकवा, तणाव इ.

कोरोनाव्हायरस आणि ब्रुसोलीसिस मधील फरक आणि समानता काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरस आणि ब्रुसोलीसिस या दोन्ही आजारांची लक्षणे एक समान‌ आहे. या दोन आजारां मधील फरक फक्त एवढाच की ब्रुसोलिसीस मध्ये अंडाशयाला सूज येते. यातील अजून एक मोठा फरक म्हणजे कोरोनाव्हायरस साठी अजूनही कोणत्याही प्रकारचे उपचार नाही मात्र ब्रुसोलिसीससाठी काही प्रकारचे अँटिबायोटिक्स उपलब्ध आहेत. तर यातील समानता म्हणजे या दोन्ही आजारांची व्हॅक्सिन मिळाली नाही‌.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
Article Reference – https://www.news18.com/news/lifestyle/brucellosis-outbreak-in-china-heres-why-india-needs-to-be-cautious-on-time-2905721.html