बॉलिवुड चित्रपट म्हटले कि त्यात मालमसाला, रोमान्स, प्रोपर्टीज् यांचा ठासुन वापर केलेला असतो. बॉलिवुड चित्रपटात दाखवली जाणारी घरे, कपडे, गाड्या या आपल्याकडेही असाव्यात अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. त्यात जर एखाद्या आवडत्या कलाकाराने चित्रपटात वापरलेल्या वस्तु मिळाल्या तर सोने पे सुहागाच…त्यामुळेच अशा वस्तु खरेदी करण्यासाठी लोक करोडो रुपये किंमत सुद्धा मोजतात. आज आम्ही तुम्हाला देव आनंद ते शम्मी कपूर पर्यंत तसेच आमिर खान पासुन ते प्रियंका चोपड़ापर्यंतच्या लिलावात काढलेल्या वस्तु सांगणार आहोत.
उमराव जान या चित्रपटात फारुख शेखने फिरोजी रंगाचा हिरा असलेली अंगठी घातली होती. ती अंगठी फारुख शेखच्या चाहत्याने ९६ हजार रुपयांना विकत घेतली होती. अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ओ माय गॉड हा चित्रपट खुप हिट ठरला होता. या चित्रपटात अक्षयने जो सुट घातला होता त्याचा तब्बल १५ लाखांना लिलाव झाला. ते पैसे अक्षयने चॅरिटीमध्ये दान केले.
जंगली चित्रपटातील शम्मी कपूरचा स्कार्फ त्याच्या चाहात्याने १.५६ लाखांना खरेदी केला होता. यूनीसेफ सेव गर्ल कैंपेन साठी अभिनेत्री प्रियंका चोपडाने तिच्या हॉट पिंक हिल्सचा लिलाव केला होता. त्या हिल्सचा लिलाव 2,50,000 रुपयांना झाला. देव आनंद यांच्या एका चाहात्याने त्यांचे ४५ फोटो मिळवण्यासाठी चार लाख रुपये खर्च केले होते.
लगान चित्रपटात अमिर खानने ज्या बॅटने बॅटींग केली होती ती नंतर लिलावात काढली. त्यावेळी ती बॅट १ लाख ५६ हजारांना विकली गेली. ते पैसेसुद्धा चॅरिटीला दान करण्यात आले.
मुझसे शादी करोगे चित्रपटातील जवानी फिर ना आये या गाण्यात सलमान खानने जो टॉवेल वापरला होता तो १.४२ लाखांना लिलावात विकण्यात आला. ते पैसे सलमानने स्नेह फाउंडेशनला दान केले होते.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या देवदास या चित्रपटातील मार डाला हे माधुरी दिक्षितचे गाणे खुप प्रसिद्ध झाले. त्या गाण्यात माधुरीने घातलेल्या लेहंग्याने मुलींना भुरळ घातली होती. त्यानंतर तो लेहंगा तीन करोड रुपयांना लिलावात काढण्यात आला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
Bollywood Updates On Just One Click