Headlines

तुम्ही जर तंदुरी रोटी आवडीने खात असाल तर सावध व्हा, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

भारतात प्रत्येक प्रांतात , राज्यात, शहरात, किंवा गावात भाषा बदलते तसेच तेथील खाद्य संस्कृतीतही बदल होत जातो. प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपरंपरेचे एक अनोखे वैशिष्ट्य असते. या शिवाय घरात जेवण बनवायला कंटाळा आला किंवा वेळे अभावी काही जणांचे रोजचे हॉटेलमध्ये खाणे होत असते. अशावेळी सर्वाधिक मागविला जाणारा पदार्थ म्हणजे रोटी.

आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पदार्थ बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे रोटी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही ठिकाणी गव्हापासुन तयार केलेली तवा रोटी असते. तर काही ठिकाणी बाजरीची, ज्वारीची मक्क्यापासुन तयार केलेली रोटी सुद्धा असते. त्यातही सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे नान आणि तंदुरी रोटी.

तंदुरी रोटी ही सर्वांचीच आवडती असते. हॉटेल मध्ये गेल्यावर बहुतेक जण भाजी सोबत गरमागरम तंदुरी रोटी ऑर्डर करतात. या रोटया तंदुर मध्ये भाजल्या जातात त्यामुळे त्या खाताना कोळश्याचा स्वाद लागत असतो. पण तुम्हाला तंदुरी रोटीचे दुसरे सत्य माहित आहे का..

जी तंदुरी रोटी सर्व आवडीने खातात तीचे सत्य माहित पडल्यावर कदाचित लोक ती सोडुन तवा रोटी खाणेच पसंत करतील. खरेतर तंदुरी रोटी ही आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. ती खाल्यावर शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. ती बनवण्याची पद्धतच मुळात तिला हानिकारक बनवत असते. तंदुरी रोटी या मैद्यापासुन तयार करतात. मैदा हा अनेक आजारांना निमंत्रण देणारा घटक आहे.

मैदा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवतो. मैद्यात ग्लाइसेमिक इंडेक्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. आणि एकदा का डायबेटीस झाला तर इतर आजार देखील शरीराला घेरतात. त्यामुळेच ज्यांना शुगरचा त्रास असतो अशा व्यक्तींनी तंदुरी रोटी खाणे टाळले पाहिजे. तंदुरी रोटीत ११० ते १५० कॅलरीज असतात. त्यामुळे तिचे शक्य तितके कमी सेवन करा. मैदा हा ह्रदयासाठी सुद्धा हानिकारक असतो. त्यामुळे ह्रदयासंबंधित विकार होण्याची शक्यता असते. म्हणुन ह्रदयासंबंधित विकार असलेल्यांनी सुद्धा तंदुरी रोटी खाणे टाळावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !