Headlines

कमाईच्या बाबतीत पतीपेक्षाही आहे अव्वल, एकटी आहे तब्बल एवढ्या करोड संपत्तीची मालकीण !

२१ सप्टेंबरला बॉलिवुडची लाडकी बेबो ४१ वर्षांची झाली. बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपुर खान. ती बॉलिवुडमध्ये सर्वात सुंदर तसेच स्टाइलिश अभिनेत्री म्हणुन ओळखली जाते. करीना नेहमीच तिच्या प्रोफेशनल तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

करीनाने २००० साली रिफ्युजी चित्रपटातुन पदार्पण केले होते. पण तिला खरी ओळख मिळाली ती कभी खुशी कभी गम या चित्रपटामुळे. या चित्रपटातील तिच्या पु म्हणजेच पुजा या पात्राने भरपुर लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिने मागे वळुन पाहिले नाही आणि इंडस्ट्रीला खुप सुपरहिट चित्रपट दिले. आजच्या काळात ती सर्वात टॉपची अभिनेत्री आहे. या व्यतिरिक्त करीना तिच्या लव लाइफमुळे सुद्धा नेहमी चर्चेत होती.

अभिनेता शाहिद कपुर सोबत ब्रेकअप झाल्यावर करीनाने अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न केले. सैफशी लग्न झाले तेव्हा ती इंडस्ट्रीच्या टॉपला होती.लग्नानंतरसुद्धा ती अभिनय करत राहिली. करीना व सैफच्या वयात खुप अंतर असल्यामुळे त्यांना खुप ट्रोल केले गेले. पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन या कपलने त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत सुरु ठेवले. तसे पाहायला गेले तर सैफकडे करीनाला द्यायला प्रेमाशिवाय बक्कळ पैसा सुद्धा आहे. पण संपत्तीच्या पलिकडे कमाईच्या बाबतीत करीना सैफच्या वरचढ आहे. चित्रपटांव्यतिरिक्त करीना अनेक स्टेज शो, जाहिराती, रेडीओ शो मधुनसुद्धा कमाई करते.

करीना कपुर खान एकटी ४१३ करोड रुपयांची मालक आहे. ती वर्षाला १२ करोड रुपये कमावते म्हणजेच महिन्याला ती १ करोड रुपये कमावते. एखाद्या जाहिरातीसाठी सुद्धा ती करोडो रुपये घेते. मुंबईसारख्या शहरात तिची अनेक घरे आणि फ्लॅट आहेत. तसेच ती महागड्या गाड्यांसाठी शौकीन आहे.

सैफ अलि खान बाबत बोलायचे झाल्यास तो हरियाणातील ८०० करोड रुपयांच्या पतौडी पॅलेसचा मालक आहे. तसेच मुंबईतसुद्धा त्याचे अनेक फ्लॅट आहेत. या शिवाय स्विझरर्लॅंड मध्ये त्याचे अलिशान घर आहे. जिथे तो अनेकदा त्याच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !