Headlines

अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?

हिंदी चित्रपट सृष्टीतील अक्षय कुमार आणि अजय देवगण हे अधिक यशस्वी व प्रसिद्ध अभिनेते आहेत. आपल्या एकामागून एक हिट चित्रपटांमुळे ते सर्वांचे आवडते अभिनेते आहेत, सोबतच ते करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. अशाच काही अभिनेत्यांव्यतिरिक्त अभिनेत्री देखील आहेत. तर अशाच एक अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात, जी या दोन्ही करोडोंचे मालक असलेल्या सुपरहिट अभिनेत्यांपेक्षा अधिक श्रीमंत आहे.

तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी “लिम्का” या शीतपेयाच्या ब्रँडसाठी तिने मॉडेल म्हणून काम केले. अभिनेत्री होण्याआधी शिल्पा शेट्टीने मॉडेल म्हणून काम सुरु ठेवले. १९९३ मधील “बाजीगर” या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक हिट चित्रपट तिने केले. त्याचबरोबर शिल्पा शेट्टी एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे.

२००९ मध्ये तिने व्यावसायिक राज कुंद्रा यांसोबत लग्न केले. राज कुंद्रा हे एक मोठे आणि श्रीमंत व्यावसायिक आहेत. Msn.com या वेबसाईट च्या अहवालानुसार शिल्पाचे पती यांचे वार्षिक उत्त्पन्न एकूण ४०० मिलियन डॉलर म्हणजेच जवळ जवळ २७०० करोड रुपये इतके आहे. तर अजय देवगणचे वार्षिक उत्पन्न ३० मिलियन डॉलर म्हणजे २२८ करोड रुपये आणि अक्षय कुमारचे १५० मिलियन डॉलर म्हणजेच ११०० करोड रुपये इतके आहे.

त्यामुळे शिल्पा शेट्टी ही अजय देवगण आणि अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांपेक्षा ही श्रीमंत आहे. शिल्पा शेट्टी ४४ वर्षांची असली तरी फार सुंदर आणि तरुण दिसते. तिच्याकडे एकापेक्षा सुंदर अशा मोठमोठ्या गाड्या आहेत. मुंबई मध्ये तरं त्यांचं स्वतःच घर आहे पण लंडन मध्ये देखील त्यांचं घर आहे. शिल्पा शेट्टी स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून देखील प्रवास करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *