Headlines

मृत्यू पश्च्यात संगीतकार श्रवण राठोड यांनी तब्बल एवढी संपत्ती आपल्या कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली, जाणून घ्या !

कोरोनाने सध्या संपुर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे कित्येक निष्पाप लोक त्यांच्या प्राणाला मुकले. अशातच बॉलिवुडसुद्धा यात मागे नाही. कोरोनाचा विळखा बॉलिवुडकरांवर सुद्धा घट्ट बसल्यामुळे अनेक दिग्गजांनी त्यात त्यांचे प्राण गमावले. अशातच अजुन अक दुखद बातमी समोर आली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते गेले काही दिवस कोरोनाशी लढा देत होते. मात्र त्यांची ती लढाई अपयशी ठरली. व त्यांनी गुरुवारी संध्याकाळी त्यांचे प्राण सोडले. त्यांना डायबेटीस सुद्धा होता त्यातच कोरोनामुळे त्यांचे फुप्फुस संक्रमित झाले. त्यामुळे त्यांना वाचवता आले नाही.

श्रवण यांच्यावर रहेजा रुग्णालयात उपचार चालु होते. त्यांच्या निधनाची बातमी डॉक्टर कीर्ति भूषण यांनी दिली. त्यांनी सांगितले कि श्रवण यांचे निधन गुरुवारी रात्री ९ वाजुन ३० मिनीटांनी झाले. आम्ही त्यांना वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला मात्र आमच्या प्रयत्नांना यश आले नाही. श्रवण यांना कोरोनामुळे कार्डियोमायोपैथी झाला होता. त्यामुळे पल्मोनरी एडिमा आणि मल्टीपल ऑर्गन फेलियर सुद्धा झाला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांसोबतच बॉलिवुडकरांनासुद्धा मोठा झटका लागला आहे.

श्रवण राठोड यांचे मित्र समीर अंजान यांनी भावुक होऊन एका चॅनलला मुलाखत दिली त्यात त्यांनी म्हटले कि माझा मित्र निघुन गेला. माझ्या शब्दांना संगीत देणारा, त्यांना लोकांच्या मनापर्यंत पोहचवणारा संगीतकार निघुन गेला. एवढी घाई का केलीस भावा..देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. तसंच तुझ्या कुटुंबाला दुख सहन करण्याची शक्ती देवो.

श्रवण आणि नदिम यांची जोडी बॉलिवुडमध्ये खुप हिट होती. ९० च्या दशकात दोघांनी मिळुन एकाहुन एक सुंदर गाणी तयार केली. जीना सिख लिया या साठी दोघांनी पहिल्यांदा संगीत दिले होते. मात्र आशिकी चित्रपटासाठी दिलेल्या संगीतामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवुन दिली.

श्रवण यांच्या अशा अचानक निघुन झाल्यामुळे बॉलिवुडचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची कमी कधीच भरुन काढली जाऊ शकत नाही. नेट वर्थ पोस्ट या संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्यांची तब्बल ७ मिलीयन डॉलर्स एवढी संपत्ती आपल्या कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !