काही लोक जन्माला येतानाच तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात. परंतु काही लोक वडिलोपार्जित श्रीमंत असून पण स्वतः कमवलेल्या पैशांवर मजा मारू इच्छितात. आणि अशा लोकांपैकीच एक आहे बॉलीवूडचा सुपरस्टार वरुण धवन. आज आम्ही तुम्हाला वरुण धवनशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.
वरुण धवनचा जन्म २४ एप्रिल १९८७ ला झाला. वरुण धवन हा बॉलीवूडचे नामांकित दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा आहे. आता वरुणचे वय ३२ वर्षे झाले आहे. श्रीमंत व्यक्तीचा मुलगा असून देखील वडिलांचा पैसा न वापरता वरुणला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे.
याच कारणास्तव वरुणने करण जोहरच्या असिस्टेंट डायरेक्टचे सुद्धा काम केले आहे. आणि त्यानंतर २०१२ मध्ये आलेल्या करण जोहर दिग्दर्शित ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिस वर इतका सुपरहिट ठरला की तो पहिल्या चित्रपटातूनच प्रसिद्धीच्या झोतात येऊन तरुणीच्या गळ्यातील ताईत बनला. आतापर्यंत वरुणने १३ चित्रपटात काम केले आहे.
वरुणचा १३ वा चित्रपट ‘स्ट्रीट डांसर 3D’ नुकताच प्रदर्शित झाला. बाकी १२ चित्रपटांपैकी फक्त कलंक हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला. बाकी सर्व चित्रपट दणदणीत चालले. आता वरुण बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. वरुणने ‘स्ट्रीट डांसर 3D’ या चित्रपटासाठी तब्बल २१ करोड रुपये फि आकारली होती. वरुण धवन वैयक्तिक आयुष्यात खूप अलिशान जीवन जगतो. त्याने स्वतःच्या कमाईच्या पैशातून मुंबईत २० करोड रुपयांचे घर खरेदी केले आहे. एवढेच नव्हे तर वरुण महागड्या गोष्टींचा खूप मोठा शौकीन आहे .
तसेच वरुणच्या घड्याळाची किंमत २० लाख रुपये आहे. तसेच तो Harley Davidson FatBoy’ या गाडीवरून फिरतो जिची किंमत १८.१५ लाख रुपये आहे. एवढेच नाही तर वरुणकडे ८५ लाख रुपयांची ‘Audi Q7’ कार सुद्धा आहे. म्हणजेच तसे बघायला गेले तर वरुण एकूण १२० करोड रुपयांचा मालक आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !