चित्रपटगृह मालक आणि सरकार किती कमावतात एका चित्रपटातून जाणून घ्या !

399

दर शुक्रवारी एक नवा चित्रपट प्रदर्शित होतो आणि तो किती चालेल, किती करोडचा टप्पा पार करेल याची चर्चा सुरु होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो बॉक्स ऑफिसवर एवढा चालतो आहे, त्याचे बॉक्स ऑफिस वर १०० करोड, २००करोड, ३०० करोड रुपये जमवले आदी संवाद कानावर पडत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की चित्रपट गृहात कमाई करणाऱ्या या चित्रपटामार्फत सरकारला आणि चित्रपट गृहाच्या मालकाला किती फायदा होत असेल. आज या पोस्ट मार्फत आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहोत.

भारतात जीएसटी येण्यापूर्वी सिनेमागृहात चित्रपटांवर सर्विस टैक्स आणि वैट मिळून २०% ते ३०% टैक्स लागायचा. या टैक्सची वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी किंमत असायची. त्यानंतर जीएसटी लागू झाल्यानंतर प्रत्येक राज्यात २८% टैक्स हीच रक्कम सगळीकडे कंपल्सरी करण्यात आली. त्यानंतर ज्या चित्रपटांच्या तिकिटांची किंमत १०० हून अधिक असते अशा चित्रपटांवर १८% टैक्स आणि १०० हून कमी तिकिटाचे दर असलेल्या चित्रपटांसाठी १२% टैक्स सगळीकडे लावण्यात आला. तसे पाहायला तर आता अधिकतर चित्रपटांचे तिकीट दर हे १०० रुपयांहून कमीच असतात. त्यामुळे चुकून एखाद्या चित्रपटापासून सरकारला १८% टैक्स मिळतो. यात ९% राज्य सरकारचा तर ९% केंद्र सरकारचा हिस्सा असतो. त्यामुळे जर एखाद्या चित्रपटाने १०० करोडची कमाई केली तर त्या चित्रपटामधून सरकारला १८ करोड रुपये मिळतात ज्यात ९   करोड रुपये केंद्र सरकार व ९ करोड रुपये राज्य सरकारला मिळतात.
काही वेळा आपण ऐकतो की अमुक एखादा चित्रपट टैक्स फ्री करण्यात आला आहे. परंतु तरीही तिकीट काढताना आपल्याला टैक्स का भरावा लागतो. जसे आम्ही तुम्हाला आधी सांगितले कि टैक्स रुपी जमा झालेली रक्कम ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार अर्धे अर्धे घेतात. त्यामुळे जरी राज्य सरकारने एखादा चित्रपट टैक्स फ्री केला तरी केंद्र सरकार साठीचा ९% टैक्स हा भरावा लागतो.
सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सिनेमागृहाच्या मालकास सुद्धा त्याचा फायदा होतो. सिनेमागृहात कमीतकमी ३ हॉलमध्ये चित्रपट लावला जातो. प्रत्येक हॉलमध्ये १६० सीट्स असतात. आणि दिवसातून ५ शो लावले जातात. आता १६० सीट x ३ हॉल x ४ शो (इथे ५ च्या ऐवजी ४ शो दिले आहेत कारण काही रात्री उशिराने चालणाऱ्या शो साठी जास्त गर्दी नसते ) = 1920 सीट. आता प्रत्येक हॉल मधील सगळ्याच सीट्स फूल होतील असे नाही त्यामुळे प्रत्येक शो साठी ३०% लोक जातात असे मानू कारण शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पुढील शुक्रवार येई पर्यंत त्या चित्रपटाचा प्रेक्षक कमी होत जातो. त्यामुळे 1920 सीट्स चे ३०% = 576 सीट्स. प्रत्येक सिनेमागृहात प्रीमियम, गोल्ड, सिल्वर अशा प्रकारे तिकिटांचे २००, १६०, आणि १४० रुपये असे दर ठरलेले असतात. त्यामुळे यांची एकूण सरासरी किंमत ( २००+१६०+१४० / ३ ) = १७० रुपये अशी असते. त्यामुळे ५७६ सीट्स x १७६ रूपए = १ लाख तेराशे रुपयांच्या आसपास प्रतिदिन पैसे मिळतात. १,०१,३०० प्रतिदिन x ३० दिवस म्हणजेच जवळ जवळ ३० लाख हून अधिक शिवाय सिनेमागृहात असणाऱ्या खायच्या प्यायच्या दुकानाच्या भाड्या मार्फत किमान १ लाख रुपये तरी मिळतात.
आता चित्रपटांच्या तिकीटामधून आणि दुकानाच्या भाड्यांमधून प्रतिमहा ३१ लाख रुपये येतात त्यातून १० लाख पगार + भाडे + ठेवी आणि १० लाख चित्रपट खरेदी साठी लागले तर सिनेमागृहाच्या मालकास दरमहा ११ लाख रुपयांचा नफा होतो. इथे आम्ही कमीत कमी लोकसंख्या धरून अंदाज बांधला आहे मात्र दिल्ली, मुंबई सारख्या शहरांची लोकसंख्या खूप आहे शिवाय येथे रात्रीचे शो देखील फुल असतात त्यामुळे या संख्येपेक्षा प्रत्यक्षातील कमाई ४ पटीने अधिकही असू शकते.