Headlines

हे कलाकार आहेत अभिनेता गोविंदाचे शत्रू, एका कलाकाराने तर गोविंदाच्या का’ना’खा’ली मारली !

आपला दमदार अभिनय, जबरदस्त डान्स आणि विनोदी संवादफेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे गोविंदा. गोविंदाने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत ऍक्शन, रोमँटिक आणि विनोदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयची जादू दाखवली. ९० च्या दशकात गोविंदाने हिंदी चित्रपटसृष्टीवर जणू राज्य केले आणि बॉलीवूडच्या अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत काम केले, परंतु सध्याच्या काळात गोविंदा क्वचितच चित्रपटांमध्ये दिसतो परंतु तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. चला तर मग आज आपण गोविंदाच्या सर्वात मोठ्या शत्रूंबद्दल जाणून घेऊयात.

शाहरुख खान – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि किंग खान शाहरुख खान हा गोविंदाचा शत्रू आहे. गोविंदा शाहरुखचा खूप तिरस्कार करतो. वास्तविक, या द्वेषाचे कारण एक मुलाखत आहे. या मुलाखतीत शाहरुख खानने गोविंदाला सांगितले की, तो आयुष्यात कधीही त्याच्यासारखा अभिनय करू शकणार नाही. गोविंदाला या गोष्टीचे वाईट वाटले आणि आजपर्यंत हे दोघे एकमेकांशी बोलतही नाहीत. मात्र, यानंतर शाहरुख खानने गोविंदाची माफी मागितली आणि गोविंदानेही माफ केले पण शाहरुखशी कधी ही गोविंदा बोलला नाही.

डेव्हिड धवन – डेव्हिड धवन हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. डेव्हिड धवन आणि गोविंदा या जोडीने जवळपास १४ वर्षे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. पण इतक्या वर्षांनंतर त्यांच्यात एका चित्रपटाबद्दल कटुता निर्माण झाली आणि त्या चित्रपटाचे नाव आहे ‘चश्मेबद्दूर’. यामध्ये या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि तेव्हापासून या दोघांमध्ये म’त’भे’द निर्माण झाले आहेत.

संजय दत्त – हे नाव पाहून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण “एक और एक ग्यारह” सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करून संजय दत्तने आपल्या जोडीने सर्वांना प्रभावित केले होते. पण एकदा गोविंदाचे नाव घेताना संजय दत्तने शिवीगाळ केल्याचे बोलले जाते. यावरूनच या दोघांमध्ये भांडण सुरू झाले आणि ते आजतागायत सुरू आहे.

सलमान खान – सलमान खान आणि गोविंदा यांनी केलेल्या “पार्टनर” चित्रपटातील या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी पसंती दर्शवली होती; बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट हिट ठरला होता. असे म्हटले जाते की या चित्रपटानंतर काही वेळातच त्यांच्यात वाद झाला होता, त्यानंतर देखील दोघे एकत्र दिसले होते, पण तेव्हा त्यांच्यात पूर्वीसारखी मैत्री दिसली नाही.

करण जोहर – बॉलिवूडमधील चित्रपट निर्माता करण जोहर आणि गोविंदामध्ये देखील म’त’भे’द आहेत. हिरो या चित्रपटातून बऱ्याच कालावधीनंतर गोविंदाने पुनरागमन केले होते. यादरम्यान करण जोहरने गोविंदाला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलावलेही नाही. एवढेच नाही तर गोविंदाने सांगितले की, करण जोहरने त्याला ३० वर्षांत कधी फोनही केला नाही. तेव्हापासून दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती.

अमरीश पुरी – भयंकर खलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरीश पुरीसोबतही गोविंदाचे संबंध चांगले नव्हते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गोविंदा सेटवर उशिरा पोहोचत असे. यासाठी अमरीश पुरी त्याला खडसावायचे, पण एके दिवशी अमरीश पुरी यांनी त्यांना फटकारले आणि या मुद्द्यावरून अनेक वर्षे दोघांमध्ये वाद सुरू होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !