Headlines

बॉलिवूड अभिनेत्यांची पहिली कमाई होती फक्त एवढे रुपये, ४थ्या आणि ५व्या अभिनेत्याची कमाई पाहून विश्वास बसणार नाही !

बॉलिवूड कलाकारांच्या गडगंज संपत्तीचा त्यांच्या राहणीमानावरून आपण अंदाज बांधू शकतो. हे कलाकार चित्रपट, इव्हेंट्स, जाहिरात यांमार्फत बक्कळ पैसे कमावतात. बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतो.

पण तुम्हाला माहित आहे का बॉलीवूडच्या किंग खानला त्याची पहिली कमाई किती मिळाली होती आणि त्याने ते पैसे कसे खर्च केले होते?

1. अक्षय कुमार – बॉलीवूड मधले खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार सध्या सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या यादीत टॉपच्या स्थानावर आहे. दरवर्षी अक्षय कुमारचे अनेक चित्रपट प्रदर्शित होतात विशेष म्हणजे त्याचे प्रत्येक चित्रपट करोडोंचा गल्ला जमा होण्यात यशस्वी होतात.
परंतु अभिनेता बनण्यापूर्वी अक्षय कुमार बँकॉक मधील एका रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करायचा. तेथे त्याला दर महिना १५०० रुपये पगार मिळायचा.

2. प्रियंका चोपडा – बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोपडाने केवळ बॉलिवुडमध्ये नव्हे तर हॉलीवूड मध्ये सुद्धा स्वतःचे नाव मोठे केले आहे. आजच्या तारखेला भलेही ती एका प्रोजेक्टसाठी करोडो रुपये फि घेत असलेली तरीही तिची पहिली कमाई ५००० रुपये होती.

प्रियंकाने तिच्या पहिल्या कमाईतून मिळालेले पैसे तिच्या आईला दिले होते. असे म्हटले जाते की तिच्या आईने आज देखील प्रियांकाच्या पहिल्या कमाईचा तो चेक सांभाळून ठेवला आहे.
3. अमिताभ बच्चन – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे आज धनदौलत मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांच्या आयुष्यात असाही एक काळ होता जेव्हा चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता.

चित्रपटांमध्ये अभिनेता बनण्यापूर्वी कोलकत्ता मधील शिपिंग फर्ममध्ये नोकरी करायचे. तेव्हा त्यांना तेथे पाचशे रुपये पगार मिळायचा.
4. अमीर खान – बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अमीर खान सध्याच्या घडीला हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

अमीर ने त्याच्या करिअरची सुरुवात एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती या कामासाठी त्याला पहिला पगार म्हणून १००० रुपये मिळाले होते. अमिरने त्याची पहिली कमाई त्याच्या आईला दिली होती.
5. शाहरुख खान – इंडस्ट्रीच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान चे नाव अग्रस्थानी असते मात्र त्याची पहिली कमाई जाणून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. शाहरुख खान ला सर्वात पहिले यांना सिंगर पंकज उदास यांच्या एका कॉन्सर्ट मध्ये काम करण्यासाठी पन्नास रुपये पहिली कमाई मिळाली होती.

या पहिल्यावहिल्या कमाईतून शाहरुख ने तिकीट खरेदी करून तो ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला गेला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !