बॉलिवूड म्हटलं कि, ग्लॅमर, पैसे, अभिनय, कलाकार, रिलेशनशिप हे सर्व आलंच. बॉलिवूडसंबंधी अनेक वेगवगेळ्या विषयांवर चर्चा हि होतच असते त्यातील एक मुद्दा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. बॉलिवूडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं एक साधारण गोष्ट आहे. फक्त आताच नाही तर पूर्वीपासूनच अनेक कलाकार हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं एक संस्कृती आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
कोणी ना कोणी लिव्ह इन मध्ये असल्याची बातमी येतच असते. बराच काळ लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर काही कपाळ हे लग्न करतात तर काही कारणास्तव वेगळे होत देखील दिसतात. तर पाहूया अशा कोणत्या अभिनेत्री आहेत ज्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यांनंतर वेगळ्याच मुलाशी लग्न केले.
1. रणबीर कपूर – दीपिका पदुकोण – बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींनपैकी एक असलेली अभिनतेरी म्हणजे दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या नात्याविषयी सर्वांनाच माहित आहे. हे दोघे हि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते, परंतु काही मतभेदांमुळे हे दोघे हि वेगळे झाले. त्यांनतर दीपिकाने अभिनेता रणवीर सिंह यांच्यासोबत लग्न केले आहे.
2. सिद्धार्थ – समंथा अक्किनेनी – सिद्धार्थ नार्थ या अभिनेत्याने “रंग दे बसंती” या चित्रपटात काम केले होते. साऊथमधील चित्रपटांमध्ये त्याने जास्त काम केले आहे, त्यामुळे साऊथमध्ये त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा प्रभू आणि सिद्धार्थ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते पण अचानक त्या दोघांमध्ये काय घडले याचा पत्ता लागला नाही. आता समंथा सुप्रसिद्ध अभिनेते नागा अर्जुन यांची सून असून त्यांचा मुलगा नागा चैतन्य यासोबत तिने विवाह केला.
3. ऐश्वर्या राय – सलमान खान – बॉलिवूडमध्ये या दोघांच्या रिलेशनशिपची फार चर्चा झाली होती. या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सर्वांनाच महित होते. परंतु एका घटनेने सर्वच बदलून टाकले आणि ही जोडी तुटली. त्या घटनेनंतर ते दोघे हि कायमचे वेगळे झाले आणि त्यानंतर ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन सोबत लग्न केले.
4. प्रियांका चोप्रा – शाहिद कपूर – प्रियांका चोप्राचे नाव शाहिद कपूर सोबत देखील जोडले गेले होते. परंतु त्या दोघांनी ही यावर भाष्य केले नव्हते. या दोघांच्या ही नात्याविषयी तेव्हा निश्चित झाले तेव्हा प्रियांका चोप्राच्या घरावर इन्कम टॅक्स टीमने छापा मारला होता आणि त्यावेळेस तिच्या घराचे दार शाहिद कपूरने उघडले होते. आता प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूड अभिनेता निक जोनास यासोबत लग्न केले असून ती त्याच्यासोबत अमेरिकेमध्ये आनंदी आयुष्य जगत आहे.
5. करिना कपूर – शाहिद कपूर – पतौडी घराण्याची सून आणि बॉलिवूडमधील बेबो करीना कपूर हिने सैफ अली खानसोबत लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत. एकेकाळी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या नात्याच्या चर्चा होत होत्या. हे दोघे हि काही काळासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
6. बिपाशा बासू – जॉन अब्राहम – बिपाशा आणि जॉन दोघे हि एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि त्यांचे नाते देखील फार चांगले होते. पण कठीण काळात ते दोघे ही एकमेकांना साथ देऊ शकले नाहीत आणि त्यामुले त्यांचे नाते टिकले नाही आणि ते वेगळे झाले. आता दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात फार सुखी आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !