Headlines

‘विवाह’ चित्रपटातील अमृता रावची सावळी धाकटी बहीण आता झाली आहे मोठी, आता दिसते खूपच सुंदर, पहा फोटो !

दरवर्षी बॉलिवुडचे अनेक चित्रपट रिलीज होत असतात. त्यातील काही चित्रपट सुपरहिट होतात तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवु शकत नाही. पण असे काही चित्रपट असतात जे फारसे चालत नसले तरी त्यातल्या कलाकारांच्या अभिनयाचे खुप कौतुक केले जाते. चित्रपट फ्लॉप होऊन सुद्धा प्रेक्षक त्यांच्या अभिनयाला विसरु शकत नाही. काही कलाकार एखाद्या काळात त्यांच्या चित्रपटांमुळे खुप चर्चेत आलेले असतात मात्र वेळेनुसार त्यांची जादु कमी होत जाते. आणि ते सुद्धा चित्रपट सृष्टी पासुन दूर होतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चित्रपट सृष्टीला राम राम केला आहे. परंतु त्यांच्या चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये होत असतात.

आज आम्ही तुम्हाला या लेखातुन विवाह चित्रपटातील अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत. अनेकांनी शाहिद कपुर आणि अमृता रावचा विवाह हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने उत्कृष्ट अभिनय केला होता. याच चित्रपटात अमृताच्या छोट्या बहिणीचे सुद्धा एक पात्र होते.
इथे आम्ही त्या पात्रा बद्दल बोलत आहोत जी चित्रपटात सावळी दाखवली होती तसेच जिच्या लग्नाची चिंता सतत तिच्या आईला लागलेली असायची. विवाह या चित्रपटात अभिनेत्री अमृता प्रकाश ने त्या छोटीची भुमिका साकारली होती. तिच्या त्या पात्राने प्रेक्षकांची मने तर जिंकुन घेतली होती. पण मंडळी अमृता प्रकाश आता कुठे आहे हे तुम्हाला माहित आहे का …. ती आता कशी दिसते…… विवाह चित्रपटातील सावळी छोटी आता मोठी झाली आहे. आणि आता खुप सुंदर दिसते.

विवाह चित्रपटाची कथा खुप चांगली होती. चित्रपटातील पात्र सुद्धा उत्तम होती. या चित्रपटाला प्रेंक्षकांचे खुप प्रेम मिळाले. या चित्रपटात शाहिद कपुर आणि अमृता राव प्रमुख भुमिकेत दिसले होते. तसेच या चित्रपटातील सहकलाकार सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसले.

अभिनेत्री अमृता प्रकाशने २००१ मध्ये तुम बिन या चित्रपटातुन बालकलाकार म्हणुन तिच्या करियरला सुरुवात केली होती. या चित्रपटातील मीनी या पात्राच्या नावाने ती खुप प्रसिद्ध झाली. त्यावेळी तिला बेस्ट चाइल्ड आर्टीस्ट म्हणुन अनेक नामांकनेसुद्धा मिळाली. त्यानंतर तिने ६ वर्षांनी म्हणजेच २००६ मध्ये विवाह चित्रपटात सुद्धा काम केले. आणि तिथपासुन ती छोटी या पात्रामुळे प्रसिद्ध झाली.

अमृता प्रकाशने चित्रपटांव्यतिरिक्त टिव्ही सिरीयलमध्ये सुद्धा काम केले आहे. अकबर बीरबल, प्यार तूने क्या किया, सीआईडी यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केले. अमृताने वयाच्या चौथ्या वर्षीच अभिनयाला सुरुवात केली होती. सुरुवातीला तिने केरळच्या एका लोकल फुटवियर कंपनीच्या जाहिरातीत काम केले. त्यानंतर डाबर, रसना, सनसिल्कसारख्या जाहिरातींत काम केले.

जाहिरातींनंतर तिने अभिनयात ब्रेक घेऊन अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले होते. अमृता प्रकाश ने मुंबई यूनिवर्सिटी मधुन कॉमर्स आणि बिजनेस एडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे. सध्या ती चित्रपटांपासुन दूर आहे. पण ती सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !