साऊथकडिल सुपरस्टार यश सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. यश चे फॅन हे केवळ साऊथ इंडस्ट्रीमधील नसुन हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा भरपुर आहेत. यशच्या चित्रपटांसाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यशने आतापर्यंत २० चित्रपटांमध्ये काम केले आहेत. त्याचे प्रत्येक चित्रपट हे ब्लॉकबस्टर होते. केजीएफ नंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रेक्षकांना आता केजीएफ २ ची प्रतिक्षा आहे.
यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. सुरुवातीला तो कन्नड टीव्ही सिरीयल्समध्ये काम करायचा. त्यानंतर २००७ मध्ये जम्बडा हुदगी या चित्रपटातुन सिनेसृष्टीत पदार्पण केले. नेहमी चित्रपटांमुळे प्रसिद्धीत राहणारा सुपरस्टार यश आता काहीशा वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. यशने एक अलिशान घर खरेदी केले आहे. सध्या त्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यशने त्याच्या पत्नीसोबत नुकतीच त्याच्या नव्या घराची पुजा केली.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये यश त्याच्या नव्या घराची कुटुंबासोबत पुजा करताना दिसत आहे. यशचे नवे घर प्रेक्षकांना खुप आवडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यश ५० करोड रुपयांच्या प्रोपर्टीचा मालक आहे. तसेच त्याच्याकडे बॅंगलोर येथे ४ करोड रुपयांचा अलिशान बंगला आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिसणारे घर यशचे दुसरे घर असु शकते.
एका फोटोत यश त्याच्या घरातील सोफो सेटवर बसुन त्याची पत्नी राधिका पंडित सोबत गप्पा मारताना दिसत आहे. तर इतर फोटोंमध्ये यश घराची पुजा करताना दिसत आहे. यशने २०१६ मध्ये कन्नड चित्रपटांतील अभिनेत्री राधिका पंडित सोबत लग्न केले होते. या दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव आर्या आहे तर मुलीचे नाव यथर्व आहे.
यश खुप अलिशान आयुष्य जगतो. त्याला गाड्यांचा खुप शॉक आहे. त्याच्याकडे एक करोड रुपयांची ऑडी क्यु ७ आणि ८० लाख रुपयांची रेंज रोवर सारख्या महागड्या कार आहेत. यश त्याच्या एका चित्रपटासाठी करोडो रुपये चार्ज घेतो. यशचे वडिल अरुण कुमार हे एक बस ड्राइव्हर आहेत. विषेश म्हणजे मुलगा एवढा मोठो सुपरस्टार असुनही ते त्याचे हे काम अजुनही करत आहेत. यशच्या वडिलांच्यामते त्यांचा मुलगा आज याच प्रोफेशन मुळे मोठा माणुस बनला आहे. त्यामुळे ते ही नोकरी सोडु शकत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
Bollywood Updates On Just One Click