Headlines

ही होती सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड, तिच्या प्रेमात दूधवाला झाला होता सलमान खान !

कियारा अडवाणी बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःचा जम बसवू पाहत आहे. तिच्या आगामी चित्रपटांमुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरत आहे. २०१४ साली कियाराने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. “फगली” हा तिचा पहिला चित्रपट होता आणि यानंतर तिने हिंदी व तेलगू चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कबीर सिंग, गुड न्यूज, एम एस धोनी या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे ती अधिक प्रसिद्ध झाली. सध्या “शेरशहा” या तिच्या आगामी चित्रपटामुळे ती अधिक चर्चेत आहे, हा चित्रपट १२ ऑगस्टला रिलीज होणार आहे. याच दरम्यान तिची एक मुलाखत सध्या व्हायरल झाली आहे, ज्यात तिने सलमान खानच्या खाजगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

सलमान खानचे कियारा अडवाणीच्या परिवारासोबत फार चांगले संबंध आहेत. सलमान खान यांच्या त्यांच्या परिवाराशी असलेले नाते य याबद्दल कियाराने मुलाखतीमध्ये सांगितले आहे. सलमान खान आणि कियाराची आई एकत्र लहानाचे मोठे झाले आहेत. ते दोघे एकत्र सायकल देखील चालवायला जात असत. लहानपणापासूनच तिची आई आणि सलमान खान एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहेत.

पुढे कियाराने सांगितले की सलमान खान तिची मावशी शाहीन हिला डेट करत होता. शाहीन आणि सलमानची ओळख कियाराच्या आईनेच करून दिली होती. शाहीन ही सलमान खानची पहिली प्रेयसी होती. सलमान खानचे तर अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. ज्यामध्ये संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरीना कैफ या अभिनेत्री आहेत. सलमान खानचे वय सध्या ५५ वर्षे असून अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलेले असताना देखील तो अद्याप अविवाहित आहे. आज ही अनेकदा सलमानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले जातात, पण तो आणि त्याचा परिवारदेखील या प्रश्नाचे उत्तर देणं टाळतात.

सलमान आणि कियारा अडवाणी एकमेकांना त्यांच्या चांगल्या पारिवारिक संबंधांमुळे कियारा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधीपासून ओळखतात. कियाराचे नाव हे आलिया होते, हे नाव बदलून वेगळे नाव ठेवण्याचा सल्ला तिला सलमान खानने दिला होता. कियाराला तिचे हे नाव प्रियांका चोप्राच्या एका चित्रपटातील तिच्या भूमिकेच्या नावावरून सुचले.
कियाराच्या “शेरशाह” या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, या चित्रपटात ती डिंपल चीमा यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट शहिद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. डिंपल चीमा या कॅप्टन बत्रा यांच्या प्रेयसी होत्या, यु*द्धा*साठी जाण्यापूर्वी कॅप्टन यांनी र*क्त कुंकू म्हणून लावले होते. अद्याप देखील डिंपल चीमा यांनी विवाह केला नाही. कॅप्टन बत्रा यांची वि*ध*वा म्हणून त्या जगत आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका पार पाडणार आहे. वास्तविक जीवनावर आधारित हा चित्रपट पाहणं फारच औत्सुक्याचं ठरेलं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !