Headlines

अभिनंदन !! नीरज चोपरावर पैश्याचा पाऊस, बघा आता पर्यंत किती रुपये आणि काय काय बक्षिसे मिळाली !

७ ऑगस्ट हा दिवस भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण दिवस ठरला. भारताचा भाला फेक अॅथलीट नीरज चोपडाने टोकियो ऑलंपिक मध्ये सुवर्ण पदक जिंकुन इतिहास घडवला. हे यश जरी त्याने एकट्याने मिळवले असले तरी त्यांच्या यशाचा जल्लोश हा सारा देश एकत्र येऊन साजरा करत आहे. सध्या नीरजवर देशभरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरजने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशासाठी मोठमोठ्या पारितोषिकांची घोषणा होत आहे.

टोकियो ऑलंपिक मध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर हरियाणा सरकारने सर्व प्रथम नीरज साठी इनाम घोषित केले. हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरजला ६ करोड रुपयांचे इनाम घोषित केले. या व्यतिरीक्त त्याला क्लास १ ची नोकरी देणार असल्याचे सुद्धा सांगितले.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहसुद्धा नीरजने मिळवलेल्या यशावर खुप खुष आहेत. त्यांनी नीरजने मिळवलेल्या यशाचा उत्सव सुद्धा साजरा केला. त्यांच्या मते नीरजचे पंजाबशी खुप जवळचे नाते आहे. त्यामुळे नीरजने मिळवलेल्या या यशाचा संपुर्ण पंजाबला गर्व आहे. त्यामुळे सीएम अमरिंदर सिंह यांनी नीरजसाठी २ करोड रुपये पारितोषिकाची घोषणा केली.

यासोबतच नीरजच्या यशावर खुष होऊन मणिपुर सरकानेसुद्धा त्याच्यासाठी एक करोड रुपये पारितोषिकाची घोषणा केली आहे. हा निर्णय कॅबिनेट मिटींगमध्ये घेतला गेल्याचे बोलले जाते. याशिवाय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डनेसुद्धा नीरजला एक करोड रुपये पारितोषिक घोषित केले आहे. याव्यतिरिक्त बीसीसीआय टोकियोमध्ये इतर पारितोषिके जिंकणाऱ्या अॅथलिटलासुद्धा पुरस्कार देणार आहे. बोर्डने रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानु आणि रवि दहिया ला प्रत्येकी ५० लाखांचे तर पीव्ही सिंधु आणि बजरंग पुनिया यांना कांस्य पदक मिळवल्या बद्दल २५ लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केली आहे.

आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्सने नीरज चोपडाला १ करोड रुपये इनाम देणार असल्याची घोषणा केली आहे. सीएसके ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले की भारतीय असल्यामुळे नीरज चोपडाचा आम्हाला गर्व आहे. या व्यतिरिक्त सीएसके नीरजने त्याच्या खेळीत ८७.५८ मीटर दूर भाला फेकला होता या स्मर्णार्थ ८७५८ असा नंबर असलेली एक स्पेशल जर्सी सुद्धा तयार करणार आहे.

टोकियो ऑलंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळवल्या नंतर इंडिगोनेसुद्धा नीरला विशेष भेटवस्तु दिली आहे. कंपनीकडुन नीरजला पुर्ण वर्षासाठी फ्रि तिकीट देण्याची घोषणा केली आहे. जेवलिन थ्रोअर नीरजसाठी ही स्किम ८ ऑगस्ट २०२१ पासुन ते ७ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागु झाली आहे. ऑटोमोबाइल कंपनी महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी नीरज चोपडाला XUV700 पारितोषिक म्हणुन देण्याची घोषणा केली आहे.

खरेतर एका ट्विटर युजरने आनंद महिंद्रा यांना नीरजला XUV700 देण्यास सांगितले होते. यावर आनंद महिंद्रा यांनी सुद्धा होकार दिला. आणि म्हटले कि आपल्या गोल्डन अॅथलिटला एक एक्सयुवी ७०० बक्षिस म्हणुन देणे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. त्यानंतर एक्सयुवी ७०० तयार ठेवावी असे आनंद महिंद्रा यांनी कंपनीला टॅग करत म्हटले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !