Headlines

आपल्या मेव्हणीचे सगळे लाड पुरवण्यासाठी सगळा खर्च करतो राज कुंद्रा? यावर शमिताने दिले हे उत्तर !

बॉलिवुडची फिटनेस क्विन शिल्पा शेट्टी तिच्या पतिमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अ*श्लि*ल चित्रपट बनवण्याच्या आरोपामुळे शिल्पाचे पती राज कुंद्रा पुर्णपणे गोत्यात आले आहे. दर दिवशी त्यांच्या विरोधात वेगवेगळे पुरावे मिळत असल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच आता राज कुंद्रा सोबत त्यांच्या घरचेही गोत्यात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी आणि तिची बहिण शमिता शेट्टीला मोठ्याप्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

काही दिवसांपुर्वी शमिता सलून मध्ये जात असताना तिला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भाउजी जे*ल मध्ये असताना ही मजा करत आहे असे खडेबोल लोकांनी शमिताला सुनावले. अशातच शमिताचा सर्व खर्च शिल्पा व राज करत असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी शमिताने उत्तर दिले आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची बहिण शमिता शिल्पाचे समर्थन करत आहे. यावर शमिताचा खर्च तिची बहिण आणि भाउजी करतात त्यामुळे ती अशी करते असे तिला ट्रोल केले जात आहे. या सर्व गोष्टींवर शमिताने सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे.

एका मुलाखती दरम्यान शमिताने तिचे मौन सोडले व म्हणाली कि मी स्पष्ट सांगते, मी माझी स्वताची काळजी घेण्यास सक्षम आहे. मी कोणावरच निर्भर नाही. शमिताने तिच्या बहिणीला पुर्णपणे समर्थन दिले. ती म्हणाली कि इतर लोक तुमच्यात असलेल्या उर्जेला कसे पाहतात ही गोष्ट नियंत्रित नाही करु शकत. लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ज्या परिस्थितीतुन जात असतात त्याच दृष्टीकोनातुन दुसऱ्याचे आयुष्य सुद्धा पाहतात. त्यावेळी ते समोरच्या व्यक्तीला पाहत नाही. त्यामुळे शक्य तितके तुमचे काम इमानदारी आणि प्रेमाने करा.

शिल्पाचा हंगामा २ हा चित्रपट सुद्धा काही दिवसांपुर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तब्बल १४ वर्षांनी शिल्पाचा चित्रपटसृष्टी कमबॅक असल्यामुळे शमिताने तिला शुभेच्छा दिल्या. शुभेच्या देताना तिने लिहिले कि, ऑल द बेस्ट, तब्बल १४ वर्षांनी तुझा चित्रपट रिलीज होत आहे, यासाठी तु आणि हंगमा २ च्या पुर्ण टीमने खुप मेहनत घेतली आहे. खुप प्रेम… मी कायम तुझ्या सोबत आहे. जीवनात तु अनेक चढ-उतार पाहिलेस. त्यात तु आणखी कणखर बनत गेलीस.. ही वेळ सुद्धा निघुन जाईल.

पतीच्या अटकेनंतर शिल्पाने एक पोस्ट शेअर केली होती . त्यात तिने तिच्या मनातील अनेक गोष्टी मांडल्या. ती म्हणाली की न्याय व्यवस्था व कायद्यावर माझा पुर्ण भरोसा आहे. मागील काही दिवस माझ्यासोठी खडतर होते. माझ्यावर खुप सारे आरोप लावले जात आहेत. खुप अफवा पसरवल्या जात आहे. मीडिया आणि काही लोकांद्वारे माझ्यावर अनेक भयंकर आरोप लावले जात आहेत. तसेच केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या परिवारावरही अनेक प्रश्न उठवले जात आहे. आम्हाला ट्रोल केले जात आहे. पण माझी बाजु सक्षम आहे. मी आतापर्यंत या प्रकरणी काही बोलली नाही आणि या पुढेही काही बोलणार नाही. या पुढे ही मी या प्रकरणी मौनच बाळगेन. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवणे बंद करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !