Headlines

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक मोठा झटका, या कारणामुळे बिग बॉस शो पुढे ढकलण्यात आला आहे !

सध्या बिग बॉस सीजन १४ या रियालिटी शोच्या अनेक चर्चा होताना दिसतात. जेव्हापासून या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे तेव्हापासून हा शो टीव्हीवर कधी लागणार याची त्याचे फॅन्स चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी असतील याचीसुद्धा प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. या शोच्या निर्मात्यांनी सुद्धा या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटींना कॉन्टॅक्ट केला आहे.
असे म्हटले जाते की बिग बॉस सीजन १४ मध्ये निया शर्मा, जस्मिन भसिन, विवियन डिसेना, आकांक्षा पुरी, नयना सिंह यांसारखे सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी होतील.

पिंकविलाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चैनल आणि या शोचे निर्माता हा शो एक महिना पुढे करणार आहेत. यामागील कारण असे सांगितले जाते की, मागील काही दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे बिग बॉस च्या सेट वरील काही भाग पावसाच्या पाण्यामुळे खराब झाला आहे. तसेच सध्या सुद्धा पावसाची रिपरिप चालूच असल्यामुळे त्या सेटच्या दुरुस्तीचे काम सुद्धा जलद गतीने होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व सुरक्षा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन हा शो ऑक्टोबर महिन्यात चालू करण्याचा विचार आणि या शोचे निर्माते करत आहेत.
तसेच या शोच्या बाबतीत अजून पर्यंत कोणतीच गोष्ट फायनल झालेली नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ४ ऑक्टोबर २०२० ला हा शो लाईव्ह टेलिकास्ट करण्याचा विचार निर्माते करत आहेत. तसेच ज्या कलाकारांची ट्रॅव्हल हिस्टरी नाही अशाच कलाकारांना या शोमध्ये स्पर्धक बनवणार आहेत. जर इतर कोणता कलाकार या शोमध्ये सहभागी होऊ इच्छित असेल तर त्याला आधी १५ दिवस क्वारंटाइन केले जाईल.
बिग बॉसच्या या नव्या सीझनचा प्रोमो बघून या शोचा फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान एका थेटर मध्ये पॉप कॉर्न खाताना दिसत असून आता बाजी पालटणार असं तो म्हणतो. या प्रोमो ला एक लाखांहून अधिक लाईक्स खूप कमी काळात मिळाल्या होत्या. यावर्षीची या शोची थीम जंगल वर आधारित आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !