Headlines

‘काम हवंय तर आधी कपडे उतरव’, मॉडेल डिंपलचा चित्रपट निर्माता साजिद खानवर गंभीर आरोप, जाणून घ्या प्रकरण !

गेली दोन वर्षे बॉलीवूड बॉलीवूड मध्ये मी टू नावाच्या आंदोलनाचे वादळ जोरदार घोंगावत आहे. एक संपते आणि दुसरे चालू होते अशा प्रकारचे वाद सध्या इंडस्ट्रीमध्ये चालू असलेले दिसतात. सुरुवातीला निमुटपणे अ न्या य सहन केलेल्या अभिनेत्रींनी हे आंदोलन सुरू झाल्यापासून स्वतःवर झालेल्या अ न्या या विरुद्ध तोंड उघडत समोरील व्यक्ती वर गंभीर आरोप केले आहेत.
अभिनेत्री तनुश्री दत्ता ने सुरू केलेले हे आंदोलन पुढे जाऊन खूप मोठे झाले या आंदोलनात इंडस्ट्री मधील अनेक अभिनेत्रींनी सहभाग घेतला ज्यामुळे अनेक कलाकार दिग्दर्शक आणि निर्माते यांना त्यांच्या कामाला मुकावे लागले. नुकतेच मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिने तिच्या सोबत घडलेली घटना सोशल मीडियावर शेअर केली होती यामध्ये तिने कोणत्याही निर्मात्या दिग्दर्शकाचे नाव घेतले नसले तरीही तिच्यावर अन्याय झाल्याचे तिने सांगितले.
आता पुन्हा एकदा हिंदी इंडस्ट्रीमध्ये ही चळवळ पुन्हा सुरू झाली आहे. यामध्ये सध्याचा आघाडीचा चित्रपट निर्माता साजिद खान यांच्यावर एका प्रसिद्ध मॉडेल गंभीर आरोप लावले. मॉडेल डिंपल पाउला हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून निर्माता साजिद खान वर गंभीर आरोप लावले आहेत.
डिंपलने म्हटले की निर्माता साजिद खान तिला कामासाठी कपडे उतरावे लागतील असे म्हटल्याचे तिने इंस्टाग्राम वर म्हटले आहे. पाउल पुढे म्हणाली की जेव्हा इंडस्ट्रीमध्ये मी टू आंदोलन सुरू झाले होते त्यावेळी अनेकांनी निर्माता साजिद खान बद्दल खुलासे केले होते मात्र त्यावेळी मला त्यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत झाली नाही.
इंडस्ट्रीमध्ये गॉडफादर असेल तर करिअर उत्तम चालते परंतु माझ्याकडे तसा कोणताही गॉडफादर नाही तसेच मला माझ्या कुटुंबासाठी पैसे कमवायचे आहे. त्यामुळे त्यावेळी मी शांत बसले. मात्र आता माझे आई-वडील माझ्यासोबत नसून मी फक्त माझ्यासाठी कमावत आहे. त्यामुळे आता मी ठामपणे सांगते की मी १७ वर्षांची असताना निर्माता साजिद खानने माझ्यासोबत गैरवर्तन केले होते.
पाउलने पुढे लिहिले कि हाउसफुल चित्रपटावेळी साजिद खानने तिला चित्रपटात काम देण्याचे आमिष दिले होते मात्र त्यासाठी त्याने तिच्या सोबत अ श्ली ल संभाषण, चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न व कपडे उतरण्यास सांगितले. माझ्यासारख्याच अशा किती मुलींसोबत साजिद खानाने असे गैरवर्तन केले आहे ते देवालाच माहीत असे पाउल म्हणाली. तसेच फक्त का स्टिं ग का उ च नव्हे तर लोकांची स्वप्न तोडणाऱ्या लोकांनासुद्धा तुरुंगात टाकायला हवे असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
बॉलीवूड निर्माता साजिद खान यांच्यावर मी टु आंदोलनात आरोप लागण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधीही येता महिला पत्रकाराने साजिद खान यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्यांच्याबद्दल पहिले प्रकरण समोर आल्यावर अभिनेत्री सलोनी चोप्रा, रशेल वाईट, सिमरन सूरी यांनीदेखील साजिद खान वर गंभीर आरोप लावले. या आरोपानंतर IFTDA ने साजिद खान यांना एका वर्षासाठी निलंबित केले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !