बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी लोकांचे प्रेम आपल्याला माहीतच आहे. त्यांना एक झलक पाहण्यासाठी लोक आतूरलेले असतात. सेलिब्रीटी जर कुठे दिसल्या तर फॅन्स त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडतात. सगळ्यांनाच त्यांसोबत फोटो काढायचे असतात पण यामुळे सेलिब्रिटी देखील गोंधळून जातात. सेलिब्रीटी कुठे बाहेर आल्या की त्यांना पाहायला सगळीकडेच लोकांची गर्दी जमते.
बॉलिवूडमधील फेमस अभिनेत्री करीना कपूर खान एरिपोर्टवर आल्यावर तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिच्याभोवती सगळ्यांचीच गर्दी जमली. यादरम्यान करीनासोबत धक्काबुक्की देखील झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.
करीना कपूर खान तिच्या नवीन चित्रपटच्या शूटिंगसाठी लंडनला जात होती तेव्हा मुंबई एअरपोर्टवर असताना तिथल्या लोकांनी तिच्या भोवती गर्दी केली. करीनासोबत एक सेल्फी घेण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरु होती. यादरम्यान एकाने करीनाला मिठी मारण्याचा प्रयत्न केला तर एकाने तिची बॅग खेचली. ती माणसं कोण होती याचा काहीच अंदाज नाही.
Kareena Kapoor Khan With Her Son Jeh Ali Khan Today Spotted At Mumbai Airport ❤️😍📷…#KareenaKapoorKhan #bollywoodactress pic.twitter.com/otlCwEdW7D
— Mix Masala (@BollywoodOnly1) October 3, 2022
करीनाने दाखवला संयम – एवढं होऊनसुद्धा करीना शांत राहिली ती कोणालाच काही बोलली नाही काही जणांसोबत तिने सेल्फी देखील काढले. हे सगळं सुरु असताना करीनासोबत धक्काबुक्की देखील झाली होती, पण करीनाने तिचा संयम सोडला नाही.
करीनासोबत तिचा छोटा मुलगा जेन देखील होता जो त्याच्या केअर टेकर कडे होता. हल्ली करीनाचा हा एअरपोर्टवरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे आणि तिचे बाकीचे फॅन्स झालेल्या प्रकरणाबद्दल राग देखील व्यक्त करत आहेत.
फॅन्स कडून करीनाचे कौतुक – वायरल होणाऱ्या व्हिडीओमधून जे दृश्य समोर आले त्यामुळे करीनाचे बाकीचे फॅन्स खूप रागात आहेत. हे लोक तिच्यासोबत असं कसं करू शकतात हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण करीनाने या सगळ्यातून जो संयम दाखवला आहे यासाठी तिचे फॅन्स तिचे खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सगळ्याच सोशल मीडियावर वायरल होताना आपल्याला दिसत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !