सामंथा रुथचे फॅन्स फक्त साउथ मध्येच नाहीत तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आणि पूर्ण बॉलीवूड मध्ये देखील आहेत. सामंथाने हिंदी इंडस्ट्रीमध्ये अजून पाऊल सुद्धा ठेवलेले नाही तरीही हिंदीमध्ये देखील सामंथाचे भरपूर चाहते आहेत. सामंथाने हल्लीच पोस्ट केलेल्या नवीन फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सामंथाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोक वाट पाहत असतात.
सामंथाने फक्त तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिंग लुक्सने सुद्धा लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. समांथा सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. ती तिच्याबद्दलची प्रत्येक माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत असते. समांथाचे फॅन्स तिच्याबद्दल सगळी माहिती मिळवण्यासाठी तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.
सामंथाचे प्रत्येक लूक मधील फोटो आपल्याला तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात. सामंथा ट्रॅडिशनल लूक असो वा वेस्टर्न दोघांमध्ये देखील ती तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचा नवीन लूक वायरल होत आहे ज्यामध्ये तिने नेटचा ट्रान्सफरन्ट ड्रेस घातला आहे.
यावेळेस तिने अनेक वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहेत. सामंथाच्या या लूकवर सगळेच फिदा झाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये या पोस्टवर तिला भरभरून कमेंट्स येत आहेत.
सामंथाने तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावले आहे. चार फिल्मफेअर पुरस्कार, एक फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार, दोन नंदी पुरस्कार, सहा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन सिनेमा पुरस्कारांसह तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सामंथाने भरपूर मेहनतीने इंडस्ट्रिमध्ये नाव निर्माण केले आहे. साऊथमधील सामंथाचे अनेक चित्रपट हिंदीमध्ये डब केले जातात त्यामुळे हिंदीमध्ये देखील सामंथाची मोठी फॅन फोलोइंग आहे.
अभिनयासोबतच सामंथा अनेक ब्रँड आणि उत्पादनांसाठी एक प्रमुख सेलिब्रिटी चेहरा आहे. तसेच तिने २०१२ मध्ये महिला आणि मुलांना वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी प्रत्युषा सपोर्ट ही स्वतःची एनजीओ देखील सुरू केला. फाऊंडेशनला सहाय्य देण्यासाठी ती जाहिराती, उत्पादन लॉन्च आणि उद्घाटन कार्यक्रमांमधून मिळालेली रक्कम तिथे दान करते. तिने स्वतःच्या मालकीचा साकी नावाचा महिलांच्या कपड्यांचा ब्रँड स्थापन केला. समंथाने २०१७ मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर सामंथा आणखीनच बोल्ड झाली आहे.
समंथाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात गौतम वासुदेव मेनन यांच्या तेलुगु चित्रपट, ये माया चेसावे मधून केली. “ये माया चेसवे” या चित्रपटसाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार, तसेच प्रतिष्ठित नंदी पुरस्कार मिळाला. समंथाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. नायडू हॉलमध्ये समानता ने बरेच काम केले आहे याच वेळेस ती रवि वर्मा यांच्या नजरेत आली आणि तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !