Headlines

एका व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत तापसी पन्नूच्या पाठीवर हाथ फिरवून बॅक वर… !

बॉलीवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीसोबत काही वाईट कृत्य केले गेले आहे. जवळ जवळ सगळ्याच अभिनेत्रींना या क्षेत्रात असताना अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. कोणासोबत लहानपणी अशा काही घटना घडल्या आहेत तर कोणासोबत चित्रपटांमध्ये येण्याआधी तर कोणासोबत स्ट्रगलिंग पिरियडमध्ये.

या घटना लहान असोत वा मोठ्या या घटनांचा परिणाम सगळ्यांवर तितकाच वाईट होतो. प्रत्येकाला आलेले अनुभव देखील वेगवेगळे असतात. आपल्या कानावर देखील सतत अशा घटना येत असतात.

तापसी पन्नू ही एक अशी अभिनेत्री आहे जीच्या सोबत तिच्या किशोरवयामध्ये छेडाछाडीचा प्रकार घडला होता. पिंक, बदला यासारख्या चित्रपटांमध्ये तापसीने काम केले आहे. आणि तिने स्वतः ही छेडछाडीची गोष्ट देखील कबूल केली आहे. तिने तिच्यासोबत घडलेला हा किस्सा मीडिया सोबत शेअर केला. पिंक बदला हे स्त्रीवादी किंवा स्त्रीची भूमिका मांडणारे असे चित्रपट आहेत. ज्यामध्ये तापसीने ठामपणे तिच्या भूमिका बजावल्या आहेत. या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिकांसाठी तापसीचे सगळीकडे कौतुक देखील केले गेले आहे.

एका इंटरव्यूमध्ये बोलत असताना तापसीने सांगितले ती दिल्लीला राहत असताना एका व्यक्तीने भर रस्त्यात तिची छेड काढली. तेव्हा तापसी चित्रपटांमध्ये काम करत नव्हती ती तर मुलींप्रमाणेच दिल्लीमध्ये एका घरात राहायची बसने प्रवास करायची. कॉलेजला असताना तापसीचे रोज बसने येणे जाणे व्हायचे.

त्याचाच फायदा घेऊन एका व्यक्तीने तापसीची छेड काढली होती. बसमध्ये गर्दी असताना या व्यक्तीने तापलेला अनेक चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टच केले होते. असे एकता नाही तर अनेक वेळेला सोबत घडले आहे.

बरेचदा गर्दीचा फायदा घेऊन तीला चुकीच्या ठिकाणी टच केल्याचा अनुभव तापसीने घेतला आहे. तापसी सोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती एकदम सुन्न झाली. एकदा तापसी गुरुद्वाराच्या बाहेर रांगेत उभी असताना तिच्या पाठीवरून कोणीतरी व्यक्ती हात फिरवून गेला.

पहिल्यांदा तापसी या सगळ्या घटनांना घाबरायची पण एकदा तिने तिच्यासोबत चुकीच वागणाऱ्या व्यक्तीचा हात पकडून त्याला चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर तो व्यक्ती गुपचप लाईनमधून बाहेर पडून निघून गेला.

२०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून तापसीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये देखील तापसीने काम केले आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर ह्या चित्रपटामधून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१५ला आलेल्या बेबी ह्या चित्रपटामध्ये देखील तिने भूमिका केली आहे. २०१६ मधल्या पिंक ह्या चित्रपटामध्ये देखील तिने काम केले आहे. द गाझी अटॅक, नाम शबाना, कंचना २, चष्मेबद्दूर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तापसी पन्नूने काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !