Headlines

रितेश सोबत लग्न करताना लोकांनी दिली होती ही चेतावणी, लग्नाच्या ८ वर्षानंतर जेनेलियाचा धक्कादायक खुलासा !

बॉलिवूड अभिनेत्री ‘जेनेलिया डिसूझा’ आणि ‘रितेश देशमुख’ ही इंडस्ट्रीमधील गोंडस जोडप्यांपैकी एक आहे. लोकांना या दोघांची जोडी खूप आवडते. जेनेलिया ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटातच नव्हे तर अनेक तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

पण जेनेलियाने रितेश देशमुखशी लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली. लग्नानंतर ती काही चित्रपटांमध्ये दिसली पण त्यात ती फक्त पाहुणे कलाकार म्हणून दिसली. माउली ती फक्त पाहुणे कलाकार म्हणून चित्रपटांमध्येही  दिसली. लग्नानंतर जेनेलिया कोणत्याही चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली नाही.

सध्या ‘इट्स माय लाइफ’ हा जुना चित्रपट रिलीज होत आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. नुकताच या चित्रपटाविषयी आणि तिच्या कारकिर्दीबद्दल बोलताना जेनेलियाने एक खुलासा केला आहे, हे पाहून तुम्हालाही थोड आश्चर्य वाटेल. पिंकविला बरोबर बोलताना अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा तिने रितेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी तिला सांगितले की तिचे करियर लग्नानंतर संपेल.

तू लग्न करू नको, तेव्हा मला आठवते की मला बऱ्याच लोकांनी लग्नाला आडवले परंतु माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती की, या सर्व गोष्टी मला रितेशशी लग्न करण्या पासून थांबवू शकत नाहीत, कारण मला स्वतःला रितेश सोबत लग्न करायचे होते. पण आता मला इंडस्ट्रीत सकारात्मक बदल दिसतो. आता इंडस्ट्रीमधील लोकांचे विचार खूप बदलले आहेत.

आपल्याला सांगण्यास खूप आनंद होत आहे की, जेनेलियाची ‘इट्स माय लाईफ’ रिलीज झाली आहे. १० वर्षापूर्वी शूट केलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. झी सिनेमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इट्स माय लाइफ २००६ च्या तेलगू चित्रपट ‘बोमारिलू’चा अधिकृत रीमेक आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी एकत्र बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. या दोघांनी 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. लग्नाआधी दोघांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केले. २०१२ मध्ये दोघांचे लग्न झाले. त्या दोघांना आता रायन आणि राहिल ही दोन मुले आहेत.

रितेश देशमुख हे महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र. रितेशला आपल्या वडिलांप्रमाणे राजकारणात रस नव्हता आणि स्वत: साठी फिल्म लाइनमध्ये करिअरची अपेक्षा होती. त्यामुळे २००३ पासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. रितेश ‘मस्ती’, ‘हाऊसफुल’, ‘धमाल’, ‘एक खलनायक’, ‘मरजावन’, ‘क्या कूल है हम’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !