विवेक ओबेरॉय बॉलिवूडमधील एक अभिनेते आहेत. गेल्या काही काळापासून आपल्याला चित्रपटांमध्ये दिसत नाहीत. विवेक असे अभिनेते आहेत जे नेहमी आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ बद्दल अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारतात.
हल्लीच विवेक ओबेरॉयना त्यांच्या पास्ट बद्दल आणि अगोदर ऐश्वर्या राय सोबत असलेल्या त्यांच्या अफेअर बद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले ते पाहून सगळेच शॉक झाले. एकवेळ अशी होती जेव्हा विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या बातम्या बॉलीवूडमध्ये सगळीकडे पसरत होत्या.
२००३ मध्ये अशी बातमी आली की, विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचा ब्रेकअप झाला आहे. त्यानंतर २०१० मध्ये विवेक ओबेरॉयनी प्रियंका अल्वा सोबत लग्न केले. आज त्यांना दोन मुलं देखील आहेत. विवेक ओबेराय एका इव्हेंटला आले असताना त्यांना असा प्रश्न केला गेला की, बॉलिवूडमध्ये तुमच्या करिअरची सुरुवात असतानाच ऐश्वर्या आणि तुमच्या रिलेशनबद्दल बातमी पसरवणे योग्य होते का? यावर विवेक ओबेरॉय म्हणाले मी या प्रश्नाचे उत्तर नाही देणार आहे.
या सगळ्या गोष्टी घडून गेल्या आहेत. पण जे यंग टॅलेंटेड लोक आहेत त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे , लाईफ मध्ये आपल्या कामावर फोकस करा आणि कामाशी कमिटेड राहा आपल्या कामाबद्दल नेहमी आपल्याकडून १००% द्या.
विवेक ओबेरॉय पुढे म्हणाले आपल्या कामाबद्दल एवढे प्रामाणिक राहा की कोणी आपल्यावर बोट उचलले नाही पाहिजे. कोणालाही आपल्या गोष्टींवर बोलण्याचा किंवा कमेंट करण्याचा काही अधिकार नाही. आपण फक्त आपल्या कामाच्या कमिटमेंटवर फोकस केला पाहिजे.
यानंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा त्यांना प्रश्न केला गेला ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ते का आपल्या पर्सनल लाईफ बाबत कोणतीच गोष्ट शेअर करत नाहीत? यावर विवेक यांनी उत्तर दिले, जर तुम्हाला असं वाटतं की आपल्या पर्सनल लाईफ बद्दल कोणी बोलू नये जर तुम्ही सेन्सिटिव्ह असाल तर त्याबाबत स्वतः पण काही न बोललेलंच बरोबर आहे.
विवेक ओबेरॉय आता रोहित शेट्टीची वेब सिरीज इंडियन पोलीस फोर्स यामध्ये दिसणार आहेत. विवेक ओबेरॉय एक उत्तम अभिनेते आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच तेलगू, मल्याळम, कन्नडा आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. एका एक्टिंगच्या वर्कशॉपमध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या डिरेक्टरने विवेक ओबेरॉईना पाहिले आणि त्यांना न्यूयॉर्कला घेऊन गेले तिथे विवेकनी फिल्म एक्टिंगमध्ये मास्टर डिग्री मिळवली.
विवेक ओबेरॉय यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात राम गोपाळ वर्मा यांचा चित्रपट कंपनी पासून केली. यासाठी त्यांना फिल्मफेअरमध्ये बेस्ट डेब्यू आणि बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा अवॉर्ड देखील मिळाला. पुढे विवेक ओबेरॉय यांनी साथिया, युवा, ओमकारा, डरना मना है, मस्ती, लक बाय चान्स, क्रिश ३, ग्रँड मस्ती, ग्रेट ग्रँड मस्ती यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. विवेक ओबेराय एक उत्तम अभिनेते आहेत. त्यांनी अभिनयाचे योग्य ते शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयाला तोड नाही ते त्यांचा प्रत्येक रोल अगदी योग्य आणि चांगल्या पद्धतीनेच निभावतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !