Headlines

उर्फी जावेद काय थांबायचं नाव घेईना, असा ड्रेस घातला व्हिडीओ मध्ये दिसत आहे पूर्णपणे … !

सोशल मीडियावर आपल्याला सगळ्या पद्धतीची माहिती मिळते. खासकरून बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींची. त्यांच्या फॅन्सना देखील त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची भरपूर उत्सुकता असते. त्यामुळे ते सोशल मीडियावर त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेत असतात. लॉकडाऊन झाल्यापासून लोकांनी सोशल मीडिया तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर वाढवला. यादरम्यानच सोशल मीडियावर नवनवीन स्टार उदयाला यायला लागले त्यातीलच एक आहे उर्फी जावेद. उर्फी सोशल मीडिया स्टार आहे. उर्फी तिच्या युनिक ड्रेसिंग स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.

उर्फी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. उर्फी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून तिचा ड्रेस तयार करत असते. ज्यामध्ये फुलं, वायर, तारा, घड्याळ, गोणपाट इ. सगळ्याचा वापर ती तिचा ड्रेस तयार करण्यासाठी करते. या तिच्या वेगळ्या ड्रेसिंग सेन्स मुळेच ती सोशल मीडियावर सगळीकडे प्रसिद्ध झाली.

उर्फी जावेद चे फोटो सोशल मीडियावर सतत वायरल होत असतात. ती प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी असा ड्रेस घालून मीडियासमोर येते की सगळीकडे तिचे चर्चा व्हायला लागते. उर्फीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर तिचे असे अनेक फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात.

या वेळेस उर्फीने लाईट हिरव्या रंगाचा स्विमसूट सारखा ड्रेस घातला होता. जो मागून पूर्ण बॅकलेस होता. ज्याला खाली मोठ्या चौकोनी जाळीदार बॉक्स जोडले होते. केसांची वेणी सारखी हेअरस्टाईल तिने केली होती. कानात मॅचिंग कानातले घातले होते. प्रत्येक वेळेसारखाच ग्लॅमरस लुक तिने केला होता.

गाडीतून उतरत असताना उर्फीने खांद्यावर जॅकेट घेतले होते. पण कॅमेरामन समोर येत असताना जॅकेट तिने काढून टाकले. उर्फी नेहमीप्रमाणेच तिच्या बिनधास्त अंदाजात कॅमेरासमोर पोज देताना दिसली. उर्फीला अनेकदा तिच्या ड्रेसिंगवरून रोल केले जाते. पण याच ड्रेसिंग मुळे आज ती सोशल मीडियावर एवढी प्रसिद्ध आहे.

उर्फी जावेद मूळची लखनऊ उत्तर प्रदेशची आहे. तिने मास कम्युनिकेशन मध्ये डिग्री मिळवली आहे. या आधी उर्फीने बडे भैया की दुल्हनिया, चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, सात फेरों की हेरा फेरी, बेपनाह, जीजी माँ, ये रिश्ता क्या कहलाता है, कसोटी जिंदगी की यासारख्या टीव्ही सिरीयल मध्ये देखील काम केले आहे. यामध्ये उर्फीने लिड रोल तर केला नव्हता पण साईड रोल म्हणून तिने या सिरीयल मध्ये काम केले होते.

https://youtu.be/4deFM76xvB8

यानंतर उर्फीच्या वेद बिग बॉस या शोमध्ये आली होती. बिग बॉस मध्ये आल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती सोशल मीडियावर देखील बरीच ऍक्टिव्ह राहायला लागली. आता उर्फीच्या वेत एमटीव्हीवरील स्प्लिट्सविला या शोमध्ये देखील आली आहे.

२०१६ पासून उर्फीने टीव्ही सिरीयल मध्ये काम करायला सुरुवात केली आहे. बडे भैया की दुल्हनिया ही तिची पहिली टीव्ही सिरीयल होती. यानंतर तिला अनेक सिरीयलमध्ये वेगवेगळे रोल मिळत गेले. पंच बीट या वेब सिरीजच्या सीजन २ मध्ये उर्फीने काम केले आहे.

उर्फी टीव्ही सिरीयलमध्ये काम करून जेवढे नाव कमावू शकले नाही तेवढे नाव तिने सोशल मीडियावर फार कमी वेळामध्ये मिळवले. उर्फी सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. ती तिचे सगळे अपडेट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी पोस्ट करत असते. आता तर सोशल मीडिया वापरणारा एकही व्यक्ती असा नसेल त्याला उर्फी जावेद माहित नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !