संगीत हा भारतीय सिनेमाचा आत्मा आहे. भारतीय संगीताची उंच्ची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नवनवीन गायक या संगीत विश्वात प्रवेश करुन स्वताची जागा निर्माण करत आहे. श्रेया घोषाल, नेहा कक्कड़ पासून ते अरिजीत सिंह पर्यंत अनेक सिंगर आणि रॅपर आहेत ज्यांनी रसिकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
पण बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा गायक कोण हे तुम्हाला माहित आहे का नसेल तर चिंता करु नका. आज आम्ही तुम्हाला सांगणार कोण आहे बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा गायक. या यादीत पंजाबी सिंगर गुरु रंधावाचे नाव सुद्धा आहे. गुरु हा केवळ पंजाबी गायक नसून बॉलिवूमध्ये देखील त्याने गाणी गायली आहेत.
अर्जित सिंह – अर्जित सिंहचे चाहते हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर पसरले आहेत. त्याची मोहब्बत पासून ते केसरिया पर्यंत सगळी गाणी लोकांच्या तोंडात बसली आहेत. अर्जितचा भावपुर्ण आवाज रसिकांना मंत्रमुग्ध करत असतो. मिळालेल्या माहितीनुसार अर्जित एका गाण्यासाठी १५ लाख रुपये फी घेतो.
नेहा कक्कड – नेहा कक्कडचा आवाज हा सध्याच्या तरुणाईचा ताईत आहे. नेहा पार्टी सॉंग, रोमॅण्टीक गाणी, सॅड सॉंग सगळ्याप्रकारची गाणी गाते. तिच्या लड़की ब्यूटीफुल कर गई चुल , आंख मारे या गाण्यांशिवाय कोणती ही पार्टी अपूर्णच राहते. नेहा एका गाण्यासाठी १० ते १५ लाख रुपये फि घेते.
बादशहा – रॅपर जगताचा बादशहा त्याच्या फास्ट बिटस् साठी ओळखला जातो. बादशहा साधारण त्याच्या एका गाण्यासाठी २० लाख रुपये चार्ज करतो. बादशहाची गाणी पार्टीमध्ये लावल्यास ती पार्टी भलतीच रंगात येते.
गुरु रंधावा – पंजाबी, हिंदी गायकांमधील लोकप्रिय गायक गुरु रंधावा त्याच्या एका गाण्यासाठी १५ लाख रुपये चार्ज करतो. लगदी लाहौर दी हे त्याचे सगळ्यात प्रसिद्ध गाणे आहे.
श्रेया घोषाल – स्वताच्या मधूर आवाजाने सर्वांची मने जिंकणारी गायिका श्रेया केवळ बॉलिवूडच नव्हे तर साऊथकडील , तसेच मराठी इंडस्ट्रीतसुद्धा गाणी गाते. मराठी मधले चंद्रा हे गाणे सध्या खूप गाजत आहे. श्रेया तिच्या एका गाण्यासाठी २० ते २५ लाख रुपये चार्ज करते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !