विद्या बालन हे बॉलिवुड मधील एक प्रसिद्ध नाव आहे. लोक तिच्या अभिनयाची कायम प्रशंसा करत असतात. विद्या मोजकेच चित्रपट करते. पण तिची निवड ही तिला नेहमीच प्रसिध्दी मिळवून देते शिवाय यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते. फार कमी लोकांना ठाऊक असेल की विद्याला एक चुलत बहीण सुद्धा आहे. आणि सौंदर्याच्या बाबतीत ती विद्या पेक्षा कमी नाही.
आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती आहे साऊथ कडील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी. प्रियामणी च्या वडिलांचे नाव वासुदेव मणी अय्यर असे आहे. आणि आईचे नाव लता अय्यर असे आहे. प्रियामणी ने स्वतः च्या प्रतिभेवर स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली.
आज ती फिल्मी दुनियेत तसेच साऊथ इंडस्ट्री मध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. प्रियामणी ची करियरची सुरूवात ही फ्लॉप चित्रपटांपासून झाली होती. मात्र हळूहळू तिची ओळख वाढत गेली आणि आता ती नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते.
प्रियामणी ने बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली सोबत सुद्धा काम केले आहे.
२००७ मध्ये परुतिविरन या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आज तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. प्रियामणी ने साऊथ कडील अनेक सुपर स्टार्स सोबत काम केले आहे.
प्रियामणी च्या सौंदर्या समोर विद्या बालन सुध्दा फिकी पडते असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. प्रियामणी चित्रपटात बोल्ड सीन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवाय एखाद्या चित्रपटात भूमिका साकारण्याची पद्धत तिची खूप वेगळी आहे.
ऑगस्ट २०१७ मध्ये मुस्तफा राज याच्याशी प्रियामणीने प्रेमविवाह केला. प्रियामणी आणि मुस्तफा यांनी रजिस्टर ऑफिसरच्या उपस्थितीत विवाह केला. प्रियामणीचा पती मुस्तफा राज मुंबईतील उद्योगपती असून, सेलिब्रिटी क्रिकेट लीगची कल्पना त्याचीच असल्याचं बोललं जातं.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !