दीपिका पदुकोणचं हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम न करण्यामागचं हे आहे कारण !

bollyreport
2 Min Read

हिंदी चित्रपट सृष्टीतील मस्तानी म्हणजेचं दीपिका पदुकोण. २०१७ साली तिने हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. xXx : The Return of Xander Cage हा पहिला हॉलीवूड चित्रपट दीपिकाने केला. हॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता विन डीजल यांच्या सोबतीने या चित्रपटामध्ये तिने काम केले. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अगदी दमदार प्रमोशन केले गेले. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन डीजलदेखील भारतामध्ये आला होता. प्रियांकाने देखील त्याच काळामध्ये बेवॉच या हॉलीवूड चित्रपटामध्ये ड्वेन जॉनसनसोबत काम केले.
त्यानंतर प्रियांका हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करू लागली. तर दुसऱ्या बाजूला दीपिका xXx: The Return of Xander Cage या हॉलीवूड चित्रपटानंतर कोणत्याही इतर हॉलीवूड चित्रपटामध्ये काम करताना दिसली नाही. मग आता असे प्रश्न पडू लागले आहेत की दीपिका कोणत्याही हॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसत का नाही? दीपिकाला हॉलीवूडमधून चित्रपटांसाठी बोलवणे येतं नाही का? किंवा दीपिकाच्या पसंतीस पडणारे पात्र तिला मिळत नाही आहे?
दीपिकाने स्वतः या विषयावर भाष्य केले आहे. दीपिका या विषयावर बोलताना म्हणाली, ती कोणताही चित्रपट भारतीय आहे किंवा आंतरराष्ट्रीय आहे, या आधारावर चित्रपटात काम करायचे की नाही हे ठरवत नाही. चित्रपट आपल्या भावना मांडण्याचे एक माध्यम आहे, असे दीपिका म्हणते आणि हा जर असा एखादा चित्रपट करण्याची संधी हॉलीवूडमधून आली तरी चालेल.
हॉलीवूडमधील पहिल्या चित्रपटामधील कामाबद्दल सांगताना ती म्हणाली, xXx: The Return of Xander Cage या चित्रपटातील दीपिकाचे पात्र एकदम दमदार होते आणि यामुळेच तिने त्या चित्रपटामध्ये काम केल्याचे सांगितले. आता दीपिका लवकरच तिचा पती रणवीर सिंहसोबत “83” या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १९८३ मध्ये भारताने जिंकलेला वर्ल्डकप आणि क्रिकेटपटू कपिल देव यांच्यावर आधारित आहे. येत्या १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *