Headlines

अक्षय कुमारच्या बायकोमुळे करण जौहर अजूनही आहे अविवाहित, जाणून घ्या काय आहे कारण !

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्देशक, निर्माते, पटकथाकार आणि कस्टम डिझायनर म्हणून प्रसिद्ध असलेले करण जौहर यांचा ४८वा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २५ मे १९७२ रोजी निर्माते यश जौहर यांचा घरात झाला. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुछ-कुछ होता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत दिग्दर्शनाचा जगात पाऊल ठेवले. या चित्रपटासाठी करण जौहर यांना उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट पटकथाकार या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

या चित्रपटानंतर ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा न कहना’, ‘माइ नेम इज खान’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’, ‘बॉम्बे टॉकीज’, घोस्ट स्टोरीज असे यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. परंतु आपल्याला एक गोष्ट तर माहीतच असेल की करण जौहर यांनी आजतागयत कोणाशी ही लग्न केलेले नाही. तर आज आपण जाणून घेऊयात करण जौहर यांचा लग्न न करण्यामागील कारण काय आहे.

करण जौहर यांचे अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यावर फार प्रेम होते आणि ट्विंकल खन्ना मुळे आजपर्यंत करण जोहर यांनी लग्न केले नाही. ट्विंकल खन्ना यांचे पुस्तक “मिसेस फनीबोन्स” याच्या पुस्तक प्रकाशना दरम्यान करण जोहर म्हणाले होते की, आजपर्यंत जर कुठल्या मुलीवर प्रेम केलं असेल तर ती ट्विंकल खन्ना आहे.

टिंकल खन्ना व करण जोहर हे एकत्र एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत होते आणि तेव्हापासूनच करण जौहर ट्विंकल खन्नावर प्रेम करत होते. करण जोहर यांच्या बोलण्यादरम्यान ट्विंकल खन्ना यांनी सांगितले की करण यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली ट्विंकल खन्नाकडे दिली होती. “त्यावेळेस मला थोड्या थोड्या मिश्या होत्या. तेव्हा करण मिश्यांकडे बघून म्हणत असे की मला तुझ्या मिश्या फार आवडतात.”

करण जौहर यांच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटामध्ये टीना नावाचे पात्र साकारण्यासाठी ऑफर दिली. परंतु ट्विंकल खन्ना यांनी पात्रासाठी साफ नकार दिला. करण जौहर यांनी चित्रपटातील टीना हे पात्र ट्विंकल खन्ना यांचा विचार करूनच निश्चित केले होते. राणी मुखर्जीने साकारलेल्या टीना या पात्राचे नाव करण जौहर यांनी ट्विंकल च्या नावावरूनच ठेवले होते. ट्विंकल खन्नाला घरी टीना नावाने हाक मारत.

लहानपणापासूनच करण जोहर यांना ट्विंकल खन्ना आवडत होती तिच्यावर प्रेम होते. ट्विंकलला देखील ही गोष्ट तेव्हाच माहित पडली होती. परंतु ट्विंकल खन्ना यांचे त्यांच्यात प्रेम नसल्याकारणाने ते दोघे कायम एक चांगले मित्र बनून राहिले. अक्षय कुमारला देखील ही गोष्ट माहीत आहे की करण जौहर यांना ट्विंकल खन्ना लहानपणापासून आवडत असे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *