Headlines

आईचे मंगळसूत्र विकून वाहनाचा दंड भरायला आला युवक, RTO ला दया अली त्याने स्वतःच भरले दंडाचे पैसे !

परिस्थिती ही अशी गोष्ट आहे जिच्या पुढे दगडालाही पाझर फुटतो. अशीच एक घटना एका टेम्पो चालकासोबत घडली. टेम्पोचे चलान भरण्यासाठी गेलेल्या एका युवकाची कहाणी ऐकुन एआरटीओ कार्यालयातील अधिकारीपण भावूक झाले. अत्यंत हालाखीचे जीवन जगणाऱ्या एका कुटुंबातील माऊलीने तिचे मंगलसूत्र विकून त्यातून आलेल्या पैशांतून तिच्या मुलाला टेम्पोचे चलान भरायला पाठवले होते. त्या मुलाची पैशांपाठची कहाणी ऐकून तेथील अधिकारी भारावून गेले. आणि त्यांनी स्वत: चलान भरण्यासाठी त्या मुलाला पैसे दिले व त्या मुलाला सोनाराकडून आईचे मंगळसूत्र सोडवण्यास सांगितले.

पुरंदरपुर येथील ताल्ही गावातील विजय कुमारचे वडील टेम्पो चालक आहेत. त्यांच्या गाडीचे ८ जूनला चालन कापून ती जप्त करुन पुरंदर ठाण्यात नेण्यात आली. सुरुवातीला विजयने सांगितले नाही. पण जेव्हा एआरटीओच्या अधिकाऱ्यांनी त्याला विश्वासात घेतले तेव्हा त्याने सर्व काही सांगितले.

विजयने सांगितले की, त्याच्या आईचे मंगळसूत्र विकून १३ हजार रुपये आले .असे सांगताना तो खूप रडायला लागला. तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी त्याला पाणी प्यायला दिले. आणि संपूर्ण गोष्ट विचारली. विजयने सांगितले की त्याच्या वडीलांना एक डोळा नाही. ते टेम्पो चालवतात. मी मजूरी करतो. नापास झाल्यामुळे हायस्कूलचे शिक्षण घेता आले नाही.

विजने पुढे सांगितले की गेल्या ८ जून ला टेम्पोचे चलान कापले गेले.त्याचे २४ हजार पाचशे रुपये भरायचे आहेत. थोडेसे पैसे माफ होतील या आशेने मी इथे आलो. मला ६ बहीणी आहेत त्यातल्या एकीचे लग्न झाले. १३ हजारांव्यतिरिक्तची रक्कम माफ झाली नाही तर माझे वडील आमच्याकडे असलेले शेत विकणार आहे. विजयची ही गोष्ट ऐकून तेथे उपस्थित अधिकारी खूप भावूक झाले.

त्यांनी विजयला निराश होण्याची गरज नाही असे सांगत स्वता सगळी रक्कम भरली. सोबतच टेम्पोचा इन्शोरेंस सुद्धा केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. विजयला थोडी रक्कम दिली आणि भविष्यात काही मदत लागली तर ते असतील असे आश्वासन दिले.

एआरटीओ आरसी भारती यांनी विजयला त्याने आणलेली रक्कम परत घेऊन जाण्यास सांगितली व आईचे मंगळसूत्र सोडवण्यास सांगितले. आणि वडीलांनासुद्धा शेत विकण्याची गरज नाही असे सांगितले. त्यांनी विजयला त्यांच्याकडील १७००० रुपये देऊन शिक्षण पुर्ण करण्यास सांगितले. त्याच्याकडून नंबर घेतला व स्वताचा नंबर देऊन गरज पडल्यास फोन कर असे सांगितले.

एआरटीओ आरसी भारती यांच्या दिलदारपणा व दयाळू पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आधीही अनेकांची मदत केली असून ते असेच सगळ्यांना मदत करतात असे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांनी सांगितले. याबाबत आरसी भारती म्हणाले की , आपल्या सगळयांना एकमेकांना समजून घेतले पाहिजे त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. एखाद्याची गरज समजून घेऊन मानवतेच्या धर्माने समोरच्याला मदत केली पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !