Headlines

कर्मचाऱ्याच्या पगाराच्या खात्यात चुकून पाठवले गेले १.४२ कोटी, कंपनीने परत मागताच भावड्याने काय केले बघा !

आपण चांगले शिक्षण घेतो, नोकरी शोधतो आणि दिवसभर काम करतो आणि त्याबदलायत आपल्याला मिळते तो पगार. आपले जीवन सुरळीत चालावे, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण दिवसभर काम करतो. आपल्याला खूप पैसे मिळावे आणि आपल्याला हवं तसं जगता यावं यासाठी प्रत्येकजण आपल्या पगाराची वाट बघत असतो.

एकदा का पगार आपल्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला कि जो आनंद होतो तो काही औरच असतो. हो की नाही?

आता जरा कल्पना करा की एखाद्या कंपनीने निश्चित पगाराऐवजी करोडो रुपये चुकून दिले तर काय होईल. कंपनीचे करोडो रुपये चुकून खात्यात आले असतील. हे पाहिल्यानंतर आपली विचार क्षमता च थांबेल हे नक्की. आता या परिस्थितीत काय करावे हे नेमकं कळत नसताना एका कर्मचाऱ्याने कंपनीचा राजीनामा देणे आणि गायब होणे योग्य मानले.

खरं तर, दक्षिण अमेरिकेतील चिली या देशामध्ये फूड इंडस्ट्रियल कन्सोर्टियम (Cial) नावाच्या कंपनीने चुकून आपल्या कर्मचाऱ्याला २८६ पट जास्त पगार दिला. या कर्मचाऱ्याचा खरा पगार ५००,००० पेसोस (अंदाजे ४३,००० रुपये) आहे. पण कंपनीने चुकून त्याच्या बँक खात्यात १६५,३९८,८५१ चिलीयन पेसोस (सुमारे १.४२ कोटी रुपये) टाकले.

सॅन जॉर्ज, ला प्रेफेरिडा आणि विंटर हे Cial कंपनी अंतर्गत मुख्य चिली ब्रँड आहेत. सेसिनास तयार करणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे. सेसिनास हे स्पॅनिश मूळचे निर्जलित मांसाचे प्रकार आहेत. बरं, जेव्हा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला चुकून टाकलेले पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा त्याने ते परत करण्याचे आश्वासन दिले.

मात्र त्यानंतर कर्मचारी आपल्या वकिलासोबत आला आणि कंपनी सोडून राजीनामा दिला. मात्र, त्यांनी सर्व पैसे कंपनीला परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर तो अशा प्रकारे बेपत्ता झाला की आजतागायत त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

३० मे रोजी कंपनीला आपल्या कर्मचार्‍यांना जादा पगाराची चूक समजली. त्याचवेळी २ जून रोजी कंपनीला रिझम्‍शन लेटर देऊन कर्मचार्‍याने संताप व्यक्त केला.

हे संपूर्ण प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसे, कंपनीने चुकून तुमच्या खात्यात करोडो रुपये टाकले तर तुम्ही काय कराल? असे पळून जायचे की सगळे पैसे कंपनीला परत करायचे? तुमचे उत्तर कमेंट मध्ये जरूर कळवा. ही बातमी तुमच्या बॉस आणि कंपनीच्या सहकाऱ्यांसोबतही शेअर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !