Headlines

दिवसभर प्रेवेडींग फोटोशूट केलं, रात्र एकत्र घालवली पण मुलाने दुसऱ्या दिवशी धक्काच दिला !

आजकाल लग्न हा एक सोहळा झाला आहे. जो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. हा सोहळा आयुष्यभरासाठी आठवणीत राहवा यासाठी फोटोशुट केले जाते. पुर्वी फोटो हे मुख्य लग्न सोहळ्यात आणि रेसेप्शनला काढले जायचे. पण आता प्री वेडींग शुट ही केले जाते. पण बुलढाणा जिल्ह्यात या प्री वेडींग शुट दरम्यान भलताच प्रकार घडला. तिथे चक्क प्रीवेडींग शुट झाल्यावर नवऱ्या मुलाने लग्न मोडले.

बुलढाणा जिल्ह्यातील एक कपल प्री-वेडींगसाठी गोव्याला गेले होते. शुट झाल्यावर दोघेही रात्री एकाच रुम मध्ये राहिले. पण दुसऱ्या दिवशी नवऱ्या मुलाच्या मनात काहीतरी भलतेच आले आणि त्याने थेट लग्न मोडले. त्यामुळे नवरी मुलीला धक्का बसला असुन या प्रकरणी तिच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

चिखली तालुक्यातील एका 20 वर्षीय मुलीचे 25 वर्षीय मुलाशी लग्न ठरले होते. जानेवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. नवरा मुलगा इंजिनिअर आहे. पुण्याला तो एका कंपनीत नोकरी करतो. या तरुण-तरुणीचा साखरपुडा झाला होता. त्या तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोला महागडा मोबाईल घेऊन दिला होता. त्याद्वारे ते दोघे तासन् तास बोलत असायचे.

लग्न जवळ आल्यामुळे दोघेही प्री-वेडींग शुट करण्याचे ठरवले. त्यासाठी ते नवरी मुलीच्या नात्यातली एक मैत्रीण आणि दोन फोटोग्राफरसहित शुट करायला गोव्याला गेले. तिथे त्यांनी एका हॉटेल मध्ये रुम बुक केली. यात तिची मैत्रिण आणि तिच्यासाठी एक रुम आणि फोटोग्राफर स्टाफसाठी एक रुम तसेच तरुणाने त्याच्यासाठी एक अशा तीन रुम बुक केल्या. जेवणानंतर रात्री तरुणाने तिला आपल्या रुममध्ये बोलावले.

त्या दोघांनी ती रात्र एकत्र एका रुममध्येच काढली. पण सकाळी उठल्यावर तरुणीसोबत एक अजब प्रकार घडला. झोपेतुन उठल्यावर त्या तरुणाने स्वताचा फोन फोडला. स्वताच्या अंगावरील कपडे फाडले. आणि अचानक मला तु हवी होतीस तशी नाही असे म्हणुन तिच्याशी ठरलेले लग्न मोडले. सध्या या प्रकरणी सामाजिक स्तरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न चालु आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !