भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि करोडोंची मालकीण नीता अंबानी यांच्या हातात जी पर्स घेतली आहे त्याची किंमत ऐकून वेडे व्हाल !

bollyreport
3 Min Read

भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि करोडोंची मालमत्ता असणारे व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. रिलायन्स ग्रुपचे ते सर्वेसर्वा आहेत. बिलियन्स मध्ये संपत्ती असणाऱ्या मुकेश अंबानींची पत्नी देखील त्यांना सोबत देत अनेक कामे पार पाडताना दिसते. निता अंबानी देखील तितक्याच लोकप्रिय आहेत. निता अंबानी यांची कामाची पद्धत, त्यांचे राहणीमान, त्यांचा स्वभाव, वागणे या व अशा अनेक गोष्टींमुळे त्या नेहमी चर्चेत असतात.

नीता अंबानी आपल्या महागड्या छंदासाठी नेहमी चर्चेत असतात. १९८५ मध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याशी लग्न केल्यानंतर नीता अंबानी एखाद्या राणीप्रमाणे जगत आहेत. नीता अंबानी यांच्याकडे अशा अनेक मौल्यवान वस्तू आहेत ज्या जगात फक्त त्यांच्याकडे आहेत. याशिवाय नीता अंबानींकडे अशी एक मौल्यवान पर्स आहे जिला जगातील सर्वात महाग पर्स म्हटले जाते.

नीता अंबानी यांच्या आलिशान कार ते शूज, दागिने आणि इतर सामान नेहमीच चर्चेत असते आणि त्यांच्याकडे या सर्वांचे भरपूर कलेक्शन देखील आहे, परंतु त्यांच्याकडे एक बॅग देखील आहे जी काही नेमक्याचं व्यक्तींकडे आहे. चला मग नीता अंबानींच्या या पर्सची खासियत जाणून घेऊया…….

नीता अंबानी २०१५ मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसल्या होत्या. यावेळी त्यांच्या हातात जगातील सर्वात महागडी पर्स दिसली होती. ३७ व्या एजीएम दरम्यान, नीता अंबानी ग्लॅमरस गुलाबी हर्म्स बर्किन बॅगसह दिसल्या, ज्याची किंमत ४८,४२,३३७ रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय २०१३ मध्ये नीता अंबानी यांनी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला यांचीही भेट घेतली होती. यावेळी नीता अंबानी गोल्डन कलरच्या स्पार्कलिंग क्लचमध्ये दिसल्या. नीता अंबानींच्या हातात दिसलेली ही बॅग सापाच्या कातडीचा ​​वापर करून बनवण्यात आली होती. एवढेच नाही तर या बॅगला २४० मौल्यवान हिरे जडले होते आणि १८ कॅरेट पांढऱ्या सोन्याचे कामही करण्यात आले होते, त्यावेळी सोशल मीडियावर त्याची किंमत सुमारे २.६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे ही पर्स नीता अंबानींसह काही मोजक्या श्रीमंत लोकांकडेच आहे. नीता अंबानी यांच्याशिवाय हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन, व्हिक्टोरिया बेकहॅम, हर्ट इव्हेंजेलिस्टा, डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी मेलानिया ट्रम्प यांच्याकडे या प्रकारची पर्स आहे. याशिवाय नीता अंबानी अनेकदा जिमी छू, चॅनेल आणि गोयार्ड सारख्या महागड्या ब्रँडच्या हँडबॅग घेऊन दिसतात. या हँडबॅगची किंमतही सुमारे ३० ते ४० लाख रुपये आहे.

नीता अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागडी कार आहे. रिपोर्टनुसार, त्यांची ही कार भारतात उपलब्ध नाही, पण ती खास परदेशातून मागवण्यात आली आहे. ही कार जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीची स्पेशल एडिशन कार ‘Audi A9 Camelion’ आहे, ज्याची किंमत ९० कोटी आहे. मात्र, भारतात पोहोचेपर्यंत या कारची किंमत १०० कोटींच्या घरात जाते. याशिवाय नीता यांच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ एस क्लास, बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पर, रोल्स रॉयस फॅंटम आणि बीएमडब्ल्यू 7 सीरीज सारख्या अनेक वाहनांचा समावेश आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.