Headlines

पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना चहाच्या ऐवजी लस्सी आणि सातू पिण्याचा दिला सल्ला, त्यामुळे आयात खर्च वाचेल !

सध्या पाकिस्तान अंत्यत हालाखीचे जीवन जगत आहे. पैशांच्या कमीमुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशातच ज्या गोष्टीमुळे दिवसाची सुरुवात तरतरीत होते. त्याच गोष्टींवर आळा घालण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.

पाकिस्तानने देशातील नागरिकांना चहा ऐवजी आता लस्सी किंवा सातू पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात स्थानिक चहाचे मळे तसेच लस्सी आणि सत्तू यांसारख्या पारंपरिक पेयांना चालना देण्यासाठी ही मार्ग सांगितला.

त्यामुळे रोजगार वाढेल तसेच जनतेत या पेयांच्या निर्माणासाठी लागणारा पैसासुद्धा उपलब्ध होईल. तसेच चहाच्या आयातीसाठी लागणारा पैसा पण वाचेल. स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानच्या मते त्यांचा देश सध्या आर्थिक संकाटाशी सामना देत आहे. १७ जूनला त्यांच्या संपत्तीचा आकडा ८.२ मिलियन अमेरिकन डॉलर झाला होता.

या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानचे योजना , विकास मंत्री अहसान इकबाल यांनी देशातील नागरिकांना चहा कमी वापरण्याचे आवाहन केले. जेणेकरुन तो पैसा वाचेल. द न्यूज इंटरनॅशनलमध्ये दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये ४० करोड अमेरिकन डॉलरचा चहा सेवन केला गेला.

मंत्र्यांनी पुढे सांगितले की जगातील चहा आयात करण्याऱ्या देशांपैकी एक असलेल्या पाकिस्तानला आता चहासाठी पैसे उधार घ्यावे लागत आहेत. इकबाल म्हणाले की मी देशवासियांना १ -२ कप चहा कमी पिण्याचे आवाहन करतो कारण सध्या आपण कर्ज घेऊन चहा आयात करत आहोत. गेल्या वर्षीचे बजेट पाहता यावर्षी पाकिस्तानने चहाच्या आयातीवर ६ करोड अमेरिकन डॉलर पैसे जास्त खर्च केले आहेत.

तर पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी सीमेंट, स्टील आणि ऑटोमोबाइल सारख्या गोष्टींवर १० टक्के सुपर टॅक्स लावण्याची घोषणा केली आहे. देश पुर्णता आर्थिक संकटाच्या हवाली जाण्यापासून वाचवणे हा या मागील उद्देश असल्याचे म्हटले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !