Headlines

‘स्वाभिमान’ सिरीयल फेम ‘पल्लवी शिर्सेकर’ अर्थात अभिनेत्री ‘पूजा बिरारी’ आहे तरी कोण जाणून घ्या !

स्टार प्रवाह वरिल संध्याकाळी साडेसहा वाजता लागणाऱ्या स्वाभिमान मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. विशेषता कॉलेजवयीन मुलांचा चाहता वर्ग या मालिकेचा जास्त आहे. कॉलेजचे जीवन, त्यात खुलणाऱ्या प्रेमकथा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते या सर्व गोष्टींमुळे स्वाभिमान मालिका प्रेक्षकांना खिळवुन ठेवत आहे. या मालिकेमुळे त्यातील प्रत्येक कलाकार देखील सध्या चर्चेत असतात.

या मालिकेत अभिनेत्री पुजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारीने मुख्य भुमिका साकारली. पुजाचा जन्म ९ ऑगस्ट १९९६ रोजी पुण्यात झाला. पुजा मुळची पुण्याचीच. तिचे बालपणही पुण्यातच गेले. त्यामुळे तिचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण हे सुद्धा पुण्यात झाले. पुजाला बालपणापासुनच अभिनयाची आवड असल्यामुळे ती तिच्या शाळेत नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकीका स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. पुजाने पुणे विद्यापिठातुन कॉम्पुटर सायन्स या विषयात पदवी मिळवली. शुटींगमुळे जरी ती मुंबईत राहत असली तरी वेळ मिळताच ती तिच्या घरी पुण्याला जात असते.

पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यावर ती तिच्या पुढील शिक्षणासाठी लंडनला जाणार होती. मात्र अभिनयाच्या आवडीने तिला लंडनला जाऊ दिले नाही व तिने अभिनय क्षेत्रात स्वताचे करियर करायचे ठरवले. तिच्या आई वडिलांनी देखील तिला पाठिंबा दिला. पुढे झी युवा वरिल साजणा मालिके साठी मुख्य भुमिकेची संधी तिच्याकडे चालुन आली. रमा ही भुमिका तिने त्या मालिकेत साकारली. या मालिकेमुळे तिला अभिनेत्री मुळे ओळख मिळाली. तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा मुख्यभुमिकेत होता. त्यानंतर तिने झी युवा वरील ऑल मोस्ट सुफळ संपुर्ण या मालिकेत छोटीशी भुमिका साकारली.

त्यानंतर ती सध्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका करत आहे. एका छोट्याशा गावातुन आलेली आई वडिलांचा पाठिंबा नसता सुद्धा स्वताची स्वप्न पुर्ण करण्यासाठी झगडणारी ही मुलगी पुजाने लिलया पार पाडली. सध्या या मालिकेत शांतनु आणि पल्लवीची प्रेमकहाणी फुलतानाचा ट्रॅक सुरु आहे. पण पुढे वडिलांचा विरोध पत्कारुन , शांतनुच्या साथीने पल्लवी तिचे स्वप्न पुरे करते का हे पाहणे रंजक ठरेल.

एक अभिनेत्री असण्यासोबतच पुजा एक मॉडेलसुद्धा आहे. तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याला तिचे मॉडेलिंगचे फोटो पाहयला मिळतात. तिने अनेक स्टेज शो केले. २०१८ मध्ये मिस पुणे प्राइड या किताबाने गौरवण्यात आले होते. तर २०१९ मध्ये तिने सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तिला सुरुवातीपासुनच कलाक्षेत्रा काम करायचे असल्यामुळे तिने अनेक ऑडिशन दिल्या व मालिकेत काम मिळवले. पुजाला तिच्या आईची हातची आमरस पुरी व पिझ्झा खायला खुप आवडतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !