कोणत्याही देशासाठी त्याचा राष्ट्रध्वज हा अभिमानाचा विषय असतो. कोणत्याही देशाचा नागरिक, सेना त्या देशाच्या सरकारी झेंड्यासाठी प्रत्येक पाऊल उचलतात. प्रत्येक देशाचा झेंडा हा वेगवेगळ्या रंगानी तयार झालेला असतो. त्या झेंड्यातील प्रत्येक रंगात कोणताना कोणता अर्थ दडलेला असतो.
भारताच्या तिरंग्यातील केशरी रंग साहस आणि बलिदानाचे प्रतिक आहे. पांढरा रंग सत्य, शांति, आणि पावित्र्याचे प्रतिक आहे. तर हिरवा रंग संपन्नतेचे निशाण आहे. अशाचप्रकारे वेगवेगळ्या देशाच्या झेंड्यातील रंग हे वेगवेगळ्या अर्थांचे प्रतिक असतात. पण मंडळी तुम्ही कधी कोणत्याही देशाच्या झेंड्यात जांभळा रंग पाहिला आहे का? कदाचित तुमचे उत्तर सुद्धा नाही असावे कारण झेंड्यांमध्ये जांभळा रंग दुर्लभ पण पाहण्यास मिळतो. यामागील कारण देखील खुप रंजक आहे.
जगात १९५ देश आहे. त्यातील केवळ २ असे देश आहे ज्यांच्या झेंड्यात जांभळा रंग दिला आहे. यामागचे कारण खुप रंजक आहे. १८०० सालापर्यंत जांभळा रंग बनवणे कठिण होते. त्याकाळी रॉयल कुटुंबा व्यतिरिक्त कोणीच जांभळ्या रंगाचा वापर करणार नाही असे क्विन एलिझाबेथने घोषित केले होते. त्यामुळे जांभळा रंग मिळवणे त्याकाळी खुपच कठीण होते.
त्याकाळी जांभळा रंग लेबनन येथील छोट्या समुद्री गोगल गाईंपासुन तयार व्हायचा. पण तो मिळवणे सहज सोप्पे नव्हते.
१ ग्रॅम जांभळा रंग तयार करण्यासाठी १० हजार गोगलगाईंना मारले जायचे. त्यानंतर रंग तयार करण्यासाठी सुद्धा खुप मेहनत घ्यावी लागायची तसेच ते खर्चिकसुद्धा होते. त्याकाळी १ पौंड जांभळा रंग तयार करण्यासाठी ४१ लाख रुपये खर्च यायचा. त्यामुळे त्याकाळी देशांनी त्यांच्या झेंड्यांमध्ये जांबळा रंग ठेवणे टाळले. १८५६ मध्ये विल्यम हेन्री पर्किन सिंथेटिक जांभळा रंग तयार करण्यात यशस्वी झाला, त्यानंतर जांभळ्या रंगाच्या किंमती घसरल्या, परंतु त्याआधी काही देशांनी जांभळा रंग सोडला होता.
या झेंड्यामध्ये आहे जांभळा रंग – डॉमिनिका या देशाने १९७८ मध्ये त्यांचा ध्वज तयार केला. त्यामध्ये जांभळ्या रंगाचा वापर केला होता. तर निकारागुआ या देशाने १९०८ मध्ये त्यांचा ध्वज तयार केला त्याला १९७१ मध्ये अधिकृत मान्यता मिळाली त्यात ही जांभळा रंग वापरण्यात आला होता. स्पेनच्या राष्ट्रीय ध्वजात काही काळासाठी जांभळा रंग ठेवण्यात आलेला.
Reference – https://hindi.news18.com/news/ajab-gajab/viral-purple-colour-rare-in-national-flags-of-countries-know-the-reason-ashas-3835357.html
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !