Headlines

पोस्ट ऑफिस मध्ये वर्षाला केवळ ३३० रुपयेचा हफ्ता भरून कुटुंबाला होऊ शकतो २ लाख रुपयांचा फायदा !

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने पीएनबी मेटलाइफ इंडिया इंश्योरेंस कंपनी लिमिटेड सोबत मिळुन ग्राहकांसाठी एक योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना. हा एक टर्म इंश्योरंस प्लॅन आहे. या योजनेत पैसे गुंतवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या परिवाराला २ लाख रुपये मिळतात.

या योजनेअंतर्गत सरकार गरीबांना आर्थिक सुविधा पुरवते. देशातील प्रत्येक नागरीकाला जीवन विम्याची सुविधा देण्यासाठी सरकारने या योजनेस सुरुवात केली आहे. चला तर या योजनेबाबत अजुन जाणून घेऊ.

या योजनेसाठी कोणत्याही वैद्यकिय पुराव्याची गरज भासत नाही – ही योजना इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या योजनेसाठी कोणत्याही वैद्यकिय पुराव्याची गरज भासत नाही. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेच्या टर्म इंश्योरंस प्लॅन साठी वयोमर्यादा कमीतकमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ५० वर्षे आहे. वयाच्या 55 व्या वर्षी ही पॉलिसी मॅच्युअर होईल.

भरावे लागणार केवळ 330 रुपये – प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेच्या टर्म इंश्योरंस प्लॅनला दरवर्षी रिन्यू करावे लागते. या योजनेतील विमा रक्कम २,००,००० रुपये आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 330 रुपये प्रिमियम देय भरावे लागेल. तर पहिल्या वर्षाचा प्रीमियम नियोजित तिमाहीवर अवलंबून असेल.

१ सप्टेंबर २०१८ पासुन योजनेस सुरुवात – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबर २०१८ ला आईपीपीबी या योजनेस सुरुवात केली होती. दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना बँकिंग सुविधा पुरविणे हे या बँकेच्या स्थापनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. ही योजना राबवण्यासाठी १.५५ लाख पोस्ट ऑफिस (ग्रामीण भागात १.३५ लाख) आणि ३ लाख पोस्टात काम करणाऱ्या पोस्ट कर्मचाऱ्यांचा वापर केला जाईल.

काय आहे हा टर्म प्लॅन – कोणत्याही विमा कंपनीचा टर्म प्लॅन म्हणजे जोखीमेतून सुरक्षा. टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विमा कंपनी पॉलिसीधारक व्यक्तीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला संपूर्ण विमा रक्कम देते. मात्र जर पॉलिसीचा अवधी संपल्यावर पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला काहीच झाले नसेल. किंवा तो ठिकठाक असेल तर त्या व्यक्तीला त्या योजनेचा कोणताच फायदा होत नाही.

पॉलिसीबाबत माहिती येथुनही मिळवु शकता – तुम्हाला जर या पॉलिसीबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही १८००१८०११११ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. किंवा www.financialservices.gov.in या अधिकृत वेबसाइटवरुन माहिती मिळवावी.

अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे सेवा – प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचे फॉर्म भारतातील वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, बांगला, कन्नड, ओडिया, मराठी, तेलगू आणि तमिळ या भाषांचा समावेश आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी http://jansuraksha.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरुन माहिती मिळवु शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !